अमळनेर : प्रतिनिधी
घरमालक ड्युटीला निघताच चार जणांनी चाकू घेऊन घरातून सुमारे दागिन्यांसह दोन लाख ३९ हजार रुपयांचा ऐवज लुटून नेल्याची घटना अमळनेरात गुरुवारी पहाटे ५ वाजेच्या सुमारास घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, दीपक पुंडलिक पाटील (रा. अयोध्यानगर, बंगालीफाईल, अमळनेर) हे रेल्वेत नोकरीला आहेत. गुरुवारी पहाटे ५ वाजता ड्युटीसाठी त्यांनी घर सोडले. काही वेळात त्यांच्या घरात चार चोरट्यांनी चाक घेऊन प्रवेश केला. घरातील सदस्यांना चाकूचा धाक दाखवून चोरट्यांनी कपाट उघडून सुमारे पाच ते सहा तोळे सोने व ४० हजार रुपयांची रोकड असा ऐवज लंपास केला. माहिती मिळताच डीवायएसपी विनायक कोते, पोलिस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्यासह उपनिरीक्षक नामदेव बोरकर आणि इतर अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. ठसे तज्ज्ञांना बोलावून पंचनामा करण्यात आला. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सरू आहे.
