नाशिक : वृत्तसंस्था
राज्यातील अनेक शहरात गुन्हेगारीच्या घटना घडत असतांना आता नाशिक शहरातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. जोपुळ रोड येथील बाजार समितीच्या गेट समोर शनिवारी रात्री हळदीचा कार्यक्रम सुरू असताना एका तरुणाचा धारधार शस्त्रांनी वार करुन निर्घृण खून करण्यात आला. रवी सोमनाथ गुंबाडे (वय 23) असे या खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.
सविस्तर वृत्त असे कि, रवी हा एका हळदी समारंभाला गेला होता. याठिकाणी त्याच्या काही मित्रांनी रवी यास नाचण्यास सांगितले पण त्याने नाचण्यास नकार दिला. यामुळे रवी व मित्रांमध्ये बाचाबाची झाली. याचा बाचाबाचीत मित्रांनी त्यास धारदार शास्त्राने मारहाण केली. वार वर्मी बसल्याने रवी गुंबाडे यांचा मृत्यू झाला. पिंपळगाव बसवंत येथील पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून तीन मित्रांना अटक केली आहे. हेमंत परसराम जाधव, जनार्दन ज्ञानेश्वर गांगुर्डे, रमेश मुरलीधर शेखरे राहणार पिंपळगाव बसवंत अंबिका नगर येथील अशी संशयितांची नावे आहेत. पुढील तपास पोलीस अधीक्षक अपराजित अग्निहोत्री, उपविभागीय अधिकारी वासुदेव देसले, पोलीस निरीक्षक रवींद्र जाधव करत आहेत.
