जळगांव : प्रतिनिधी
नाथ समाज प्रिमियर लीग स्पर्धेत ‘गोरक्षनाथ टायटन्स ‘ संघाने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत प्रथम क्रमांकावर मजल मारत विजेतेपद पटकावले. अंतिम सामन्यात चुरशीची लढत देत संघाने प्रतिस्पर्ध्याना कडी टक्कर देत विजेतेपदावर आपले नाव कोरले आणि प्रेक्षकांची मने जिंकली. स्पर्धेत सातत्यपूर्ण कामगिरी करत संघाने वर्ल्ड कपसमान भव्य ट्रॉफी जिंकून आपल्या जळगांवात जल्लोषात पुनरागमन केले. खेळाडूंनी मैदानावर फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही विभागांत दमदार कामगिरी करत संघाचे नाव उंचावले. संघभावना, जिद्द आणि

शिस्त यांच्या जोरावर गोरक्षनाथ टायटन्स संपूर्ण स्पर्धेत आपली छाप सोडली. या यशाबद्दल नाथसमाजानी आणि चाहत्यांनी खेळाडूंचे जल्लोषात स्वागत केले. संघातील खेळाडू (c) भावेश नाथ ;राहुल मोरे, उमेश पवार , मयूर नाथ, किरण बागल, उमेश सूर्यवंशी, राज शेटे, सनय जाधव, राहुल जाधव, , युवराज कासार, विनोद नाथ, शुभम जाधव संघाच्या या यशामुळे नाथ समाजात आनंदाचे वातावरण पसरले असून पुढील स्पर्धामध्ये असेच यश मिळवण्याचा निर्धार संघाने व्यक्त केला आहे.
“हार मानली नाही, म्हणूनच विजेतेपद जिंकले!”
आयोजक
1=शुभम बावा
2=जितेंद्र नाथ
3=चेतन जाधव
4=नाना मोरे
5=सतिष सोनवणे
यांनी विजेतेपद ट्राफि देऊन गोरक्षनाथ टायटन्स टीमचे अभिनंदन केले


