Home » जळगाव » शासकीय कर्मचारीच देतात वाळूचोरांना टीप ; तर पोलीस व महसूलचे टोलवा-टोलवीचे उत्तर !

शासकीय कर्मचारीच देतात वाळूचोरांना टीप ; तर पोलीस व महसूलचे टोलवा-टोलवीचे उत्तर !

जळगाव : प्रतिनिधी        – भाग – २ 

गेल्या काही महिन्यापासून जिल्ह्यासह जळगाव शहरात देखील मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उत्खनन होऊन त्याची मोठ्या प्रमाणात वाहतूक देखील होत आहे मात्र याकडे जळगाव महसूल प्रशासनाचे साफ दुर्लक्ष दिसत असले तरी महसूल अधिकारी टोलवाटोलवीचे उत्तर देत आहे.

जळगाव शहरालगत असलेल्या गिरणा नदी पात्रातून दिवस-रात्र लाखो अवैध वाळूचे उत्खनन होत असताना महसूल प्रशासन याकडे साफ दुर्लक्ष करीत असताना काही महसूलच्या अधिकाऱ्यांनी पोलीस प्रशासनाने कारवाई करावी अशी उत्तर देत आहे. मात्र पोलीस प्रशासन देखील असेच उत्तर देते की महसूल अधिकारी जर आम्हाला बोलवतील किंवा सोबत कारवाई करण्यास येत असतील तरच आम्ही कारवाई करू शकतो. असे उत्तर पोलीस विभागातर्फे येत असल्याने या दोघी प्रशासनाच्या उत्तरामुळे अवैध वाळू चोरांना याचा फायदा होऊन लाखो ब्रास वाळू गिरणा नदी पात्रातून काढून जिल्ह्यातील अनेक ठिकाणी बांधकाम मोठ्या प्रमाणात होत आहे यावर कोण कारवाई करणार याकडे सर्वसामान्य नागरिकांचे लक्ष लागून आहे.

शासकीय कर्मचारीच देतात वाळूचोरांना टीप !
जळगाव शहरातील काही कर्तव्यदक्ष अधिकारी वाळू वाहतुकीचे ट्रॅक्टर डंपर पकडण्यासाठी जात असतात मात्र त्यांच्या हाती कुठलंही ट्रॅक्टर किंवा डंपर हाती लागत नाही हे कर्तव्यदक्ष अधिकारी सातत्याने सांगत असतात मात्र हे अधिकारी कारवाईसाठी निघत असल्याची गुप्त बातमी त्यांच्याच जवळचे काही अधिकारी व कर्मचारी वाळू चोरांना देत असल्याने वाळू चोरी मध्ये कुठलीही ट्रॅक्टर किंवा डंपर या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांना नेहमीच सापडतच नाही त्यामुळे ही कारवाई होऊ शकत नाही. अशी भावना एका बड्या अधिकाऱ्यांनी व्यक्त करून दाखवली आहे

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *