जळगाव : प्रतिनिधी
शहरातील एमआयडीसीतील सुमेरसिंग ढाबा येथे भरधाव वेगाने येणाऱ्या दुचाकीने दुसऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दोन मित्र गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवारी १८ जुलै रोजी दुपारी ४ वाजता समोर आली आहे. याप्रकरणी शनीवारी १९ जुलै रोजी रात्री ८ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर वृत्त असे कि, शहरातील एमआयडीसी परिसरात सुमेरसिंग ढाबा येथून मोहम्मद अजेर अनवर शेख वय २९ रा. फातेमा नगर आणि त्याचा मित्र कडू पिंजारी हे दोघे शुक्रवारी १८ जुलै रोजी दुपारी ४ वाजता दुचाकी क्रमांक (एमएच ०५ बीबी ४६५९) ने जात असतांना समोरू येणारी दुचाकी क्रमांक (एमएच १९ ईएन ६३०६) ने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत मोहम्मत अजेर आणि कडू पिंजारी हे दोघे गंभीर जखमी झाले. हा अपघात झाल्यानंतर समोरील अज्ञात दुचाकीधारक हा घटनास्थळ येथू पळून गेला.



