September 29, 2026 7:24 am

लाईव्ह न्यूज :
लाईव्ह न्यूज :

प्रदेशाध्यक्ष तटकरेंचा इशारा : कृषिमंत्र्यांचे मंत्रिपद धोक्यात?

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकारमधील कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा विधानसभेत ऑनलाइन रमी खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने आणि शेतकऱ्यांबाबतच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे त्यांचे मंत्रिपद धोक्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी धाराशिव येथे छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी भेटीनंतर कोकाटे यांच्या वर्तनाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. “शेतकरी संकटात असताना कृषीमंत्र्यांचे असे वर्तन […]

शासनाने तीन महिन्यांची मुदतवाढ द्यावी ; अनिल अडकमोल !

जळगाव : प्रतिनिधी जळगाव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना आज दि.२१ रोजी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडीया (आ.) महानगरअध्यक्ष अनिल अडकमोल  यांनी सततच्या सर्व्हर प्रॉब्लेममुळे मोफत धान्य वाटप तसेच ई-केवायसी करण्यास अडचण शासनाने तीन महिन्यांची मुदतवाढ द्यावी यासाठी निवेदन सादर केले आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाची जिल्हा प्रशासनाकडे निवेदनाद्वारे मागणी करण्यात येते की, शासनाच्या अन्न […]

छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना बेदम मारहाण भोवल : चव्हाण यांचा राजीनामा !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासमोर छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी रविवारी (दि.२०) पत्ते फेकल्याने जोरदार राडा झाला होता. यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी निवेदन देणाऱ्या छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना बेदम मारहाण केली. लातूरमध्ये ही घटना घडली होती. या मारहाणीच्या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला. छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजय कुमार घाडगे यांना मारहाण केल्याच्या निषेधार्थ छावा […]

मंत्री कोकाटे यांचे उत्तर : मी कोणताही गेम खेळत नव्हतो, मी काही पाप केले नाही !

नाशिक : वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकारमधील अजित पवार गटाचे मंत्री कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांना मंत्रिपद मिळाल्यापासून नेहमीच वादाची किनार लागत असून आता थेट विधिमंडळामध्येच मोबाइलवर जंगली रमी गेम खेळतानाचा व्हिडिओ आमदार रोहित पवार यांनी ट्विट केल्यानंतर मंत्री कोकाटे पुन्हा एकदा वादात सापडले आहेत. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मंत्री कोकाटे यांनी अजब उत्तर दिले आहे. मी […]

१७ वर्षीय मुलाला शिवीगाळ करीत जबर मारहाण !

जळगाव : प्रतिनिधी आपल्याकडे पाहून बोलत असल्याच्या संशयावरून १७ वर्षीय मुलाला शिवीगाळ व मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची धक्कादायक घटना रात्री ९.३० वाजता तांबापूरा येथे घडली आहे. याबाबत शनिवारी १९ जुलै रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आशाबाई मधुकर शेटे (वय ४२) या महिला तांबापूरा या भागात आपल्या मुलासह […]

बसस्थानक परिसरात अनोळखीने संपविले आयुष्य !

पारोळा : प्रतिनिधी शहरातील बस स्थानकाच्या आवारात पहाटेच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याची घटना दि. १९ रोजी पहाटेच्या सुमारास घडली. शहरातील बस स्थानक परिसरामध्ये असलेल्या लिंबाच्या झाडाला कोणीतरी अज्ञात इसमाने साधारण (वय-३०) याने सुती दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याची घटना पहाटे सहा वाजेच्या सुमारास पेपर विक्रेता निंबा मराठे यांच्या लक्षात […]

दोन दुचाकीचा भीषण अपघात : दोन मित्र गंभीर जखमी !

जळगाव : प्रतिनिधी शहरातील एमआयडीसीतील सुमेरसिंग ढाबा येथे भरधाव वेगाने येणाऱ्या दुचाकीने दुसऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दोन मित्र गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवारी १८ जुलै रोजी दुपारी ४ वाजता समोर आली आहे. याप्रकरणी शनीवारी १९ जुलै रोजी रात्री ८ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, शहरातील एमआयडीसी […]

२० वर्षीय तरुणाचा प्रताप : १५ वर्षीय मुलीला केले गर्भवती !

जळगाव : प्रतिनिधी १५ वर्षीय अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून २० वर्षीय तरुणाने तिच्यावर अत्याचार केला. यातून ही मुलगी गर्भवती राहिली. गेल्या एक वर्षापासून हा तरुण स्वतःच्या घरासह मुलीच्या घरी तिच्यावर वेळोवेळी अत्याचार करीत होता. या प्रकरणी निखिल लीलाधर कोळी (२०) याच्याविरुद्ध शनिपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येऊन त्याला अटक करण्यात आले आहे. मिळालेल्या […]

मालवाहू ट्रक केबीनवर धडकली : ट्रॅव्हल्सविरुद्ध दिशेला झाली

जळगाव : प्रतिनिधी औद्योगिक वसाहत परिसरातून मुख्य रस्त्याला लागणाऱ्या ट्रकला जळगावकडे येणाऱ्या ट्रॅव्हल्सने धडक देऊन ती विरुद्ध दिशेला जाऊन काँक्रीटच्या गटारीवर धडकली. यामध्ये दोन्ही वाहनांचे नुकसान झाले. सुदैवाने अपघातात कोणालाही दुखापत झाली नाही. हा अपघात रविवारी (२० जुलै) दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास रेमंड कंपनीच्या मागील बाजूच्या रस्त्यावर झाला. मिळालेल्या माहितीनुसार, औद्योगिक वसाहत परिसरातील एसएस ९ […]

मध्यरात्री गोदावरी महाविद्यालयात चोरट्यांचा धुमाकूळ : एक लाख लांबविले !

जळगाव : प्रतिनिधी रात्रीच्या वेळी महाविद्यालयाचे प्रवेशद्वार उघडून चोरट्यांनी रोख एक लाख रुपयांसह सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा एनव्हीआर असा एकूण एक लाख पाच हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. ही घटना १८ जुलै रोजी मध्यरात्री गोदावरी आयएमआर लेखापाल विभागात घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, १८ जुलै रोजी […]

error: Content is protected !!