जळगाव : प्रतिनिधी
फटाक्यांचे दुष्परिणाम पाहून श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक च्या विद्यार्थ्यांनी फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याची शपथ घेतली. मनपा शिक्षण विभाग जळगाव मार्फत मंगळवारी फटाक्यांच्या दुष्परिणामांबाबत जागृती करणारे पत्रक निघाल्यावर मी फटाके फोडणार नाही अभियान अंतर्गत शिक्षकांनी विद्यार्थ्यांना फटाक्यांचे दुष्परिणाम सांगून ही दिवाळी फटाकेमुक्त साजरी करण्याची शपथ दिली.
बुधवारी शाळेत हा कार्यक्रम झाला. रूपाली आव्हाड मॅडमानी विद्यार्थ्यांना फटाक्यांचे दुष्परिणाम समजून सांगितले. त्यात प्रामुख्याने हवेचे ध्वनी प्रदूषण म्हणजे काय, याची मुलांना माहिती देण्यात आली. फटाके कसे धोकादायक रसायनां पासून बनवले जातात, याची त्यांनी माहिती दिली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी मैदानात जमून यापुढे फटाके फोडण्याची शपथ घेतली.
मुख्याध्यापक मुकेश नाईक म्हणाले, गेल्या वर्षी फटाकेमुक्त दिवाळी उपक्रमात आमच्या शाळेतील मुलांनी सहभाग घेतला होता. त्यानंतर विद्यार्थ्यांनीच त्यांच्या पाालकांकडे फटाके आणू नका, असा आग्रह धरला.
