जळगांव : प्रतिनिधी
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मिनल करनवाल या बुधवार दि. 11 जून रोजी यावल तालुक्याच्या दौऱ्यावर गेल्या होत्या या वेळी त्यांनी डाभुर्णी गावातील सुरु असलेल्या घरकूल कामांची पाहणी करून आढावा घेतला. या वेळी घरकुलाची कामे तातडीने पूर्ण करण्याबाबत दक्षता घेण्याच्या व कामे दर्जेदार करण्याबाबत सूचना दिल्या. त्या सोबतच किनगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे भेट देऊन पाहणी केली व आरोग्य सुविधा योग्य व पारदर्शक पद्धतीने देण्याबाबत सूचना दिल्या.

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मिनल करनवाल या बुधवार दि. 11 जून रोजी यावल तालुक्याच्या दौऱ्यावर गेल्या होत्या या दौऱ्या दरम्यान त्यांनी यावल तालुक्यातील डाभूर्णी गावात भेट देऊन गावात सुरु असलेली घरकुलाची कामे यांची पाहणी करून मंजूर कामे व सुरु. असलेली बांधकामे यांचा आढावा घेत कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याबाबत सूचना देऊन घरकुलाचे लाभार्थी यांचेशी संवाद साधला. यावल तालुक्यातील किनगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे भेट देऊन आदिवासी भागातील आरोग्य उपकेंद्र यांचे वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सेविका, आशा वर्कर व अंगणवाडी सेविका यांचेशी संवाद साधून ग्रामीण भागातील व त्यातल्या त्यात आदिवासी भागातील दुर्गम गावामध्ये आरोग्य सेवा पुरविण्याबाबत सूचना देऊन आढावा घेण्यात आला. यावेळी श्रीमती करनवाल यांनी कर्मचाऱ्यांशी मनमोकळा संवाद साधत प्रत्यक्ष काम करताना येणाऱ्या अडचणी बाबत माहिती घेऊन त्या कशा सोडविता येतील याबाबत मार्गदर्शन केले. या दौऱ्या दरम्यान श्रीमती करनवाल यांनी यावल येथील पंचायत समिती ला भेट देऊन पाहणी केली. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर,पंचायत समिती यावल च्या गटविकास अधिकारी मंजुश्री गायकवाड यांचेसह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.



