Home » जळगाव » अमळनेर » सहा महिन्यांकरिता जळगाव जिल्ह्यातून कात्या हद्दपार !

सहा महिन्यांकरिता जळगाव जिल्ह्यातून कात्या हद्दपार !

अमळनेर : प्रतिनिधी

शहरातील शिरुडनाका परिसरातील शिवाजीनगर भागातील कात्या उर्फ प्रमोद गौरव महाले याला उपविभागीय अधिकारी नितीनकुमार मुंडावरे यांनी सहा महिन्यांकरिता जळगाव जिल्ह्यातून हद्दपार केले आहे.

सविस्तर वृत्त असे कि, कात्या उर्फ प्रमोद महाले याच्यावर चोरी, दरोडा, जीवे मारण्याची धमकी देऊन लूटमार, जबरी लूट यासारखे सहा गुन्हे दाखल असून ते न्यायप्रविष्ट आहेत. त्याची शहरात दहशत असून तो एका खटल्यात न्यायालयात हजर देखील न झाल्याने  जामीनाच्या अटी-शर्तीचा भंग झाला आहे. दरम्यान, पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी डीवायएसपी विनायक कोते यांच्याकडे त्याच्या हद्दपारीचा प्रस्ताव पाठवला होता. डीवायएसपींनी तो प्रस्ताव चौकशी करून उपविभागीय अधिकाऱ्यांकडे पाठवला. यावर सुनावणी झाली. तर दोन्ही बाजू ऐकून उपविभागीय अधिकारी नितीनकुमार मुंडावरे यांनी कात्या उर्फ प्रमोद महाले याला जळगाव जिल्ह्यातून सहा महिन्यांसाठी हद्दपार केले आहे.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *