भुसावळ : प्रतिनिधी
फी मागितल्याच्या कारणावरून एका वकिलाला शिवीगाळ करत मारहाण करण्यात आली. न्यायालय परिसरात घडलेल्या घटनेप्रकरणी भुसावळ शहर पोलिस ठाण्यात एकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तर संशयित मात्र पसार झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विवेक केशव आवारे (४२, रा. फेकरी, भुसावळ) हे वकील व्यवसाय करतात. सोमवार १५ सप्टेंबर रोजी दुपारी १ वाजता आवारे हे न्यायालयातील रूम क्र. १०३ जवळ असताना धनंजय पंडित पाटील (निवासी जुना सातारा, भुसावळ) येथे आले. त्यांनी वकिलांना ‘ना हरकत पत्र’ द्यावे, अशी मागणी केली. त्यावर आवारे यांनी सांगितले की, फी भरल्यानंतरच पत्र दिले जाईल, हे ऐकून पाटील संतापला. त्यांनी वकिलाला शिवीगाळ केली, कॉलर पकडून दमदाटी केली. इतकेच नव्हे तर ‘धमकी ही दिली. त्यानंतर त्यांनी आवारे यांच्या मारहाण केली. याप्रकरणी भुसावळ शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
