Home » जळगाव » एलसीबीने केला पर्दाफाश : दुचाकी घेणारा व विकणाऱ्यासह एजंट ताब्यात !

एलसीबीने केला पर्दाफाश : दुचाकी घेणारा व विकणाऱ्यासह एजंट ताब्यात !

भुसावळ : प्रतिनिधी

कर्जाचे हप्ते थकल्यामुळे हप्त्याने काढलेली दुचाकी परस्पर विकून ती दुचाकी चोरी झाल्याचा बनाव करणाऱ्यांचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला. दरम्यान, दुचाकी विक्री करणाऱ्यासह घेणारा आणि एजंट या तिघांना अटक करण्यात आली आहे.

जिल्ह्यात दुचाकी चोरीच्या घटना वाढत असल्याने त्या उघडकीस आणण्याच्या सूचना स्थानिक गुन्हे शाखेला दिल्या होत्या. त्यानुसार यावल तालुक्यातील दगडी मनवेल येथील अशोक मोरे याच्याकडे चोरीची दुचाकी असल्याची माहिती पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना मिळाली. त्यांनी लागलीच पोहेकॉ प्रितमकुमार पाटील, यशवंत टहाकळे, बबन पाटील, प्रदीप सपकाळे यांचे पथक तयार करुन त्याला चौकशीसाठी ताब्यात घेण्याच्या सूचना दिल्या. त्याला (एमएच १९, सीसी ६६४०) क्रमांकाच्या दुचाकीसह ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता, त्याने पाच वर्षापुर्वी रावेर येथील वाहन खरेदी करणारा एजंट जफर शेख उस्मान (रा. ह. मु. जामन मोहल्ला, भुसावळ) याच्यामार्फत प्रमोद निलेश कोळी (रा. हुडको कॉलनी, भुसावळ) याच्या दुचाकीचा सौदा केल्याचे सांगितले.

संबंधित फायनान्स कंपनीची फसवणुक करण्यासाठी चोरीचा बनाव करणाऱ्यांचा पर्दाफाश झाल्यानंतर एलसीबीच्या पथकाने दुचाकी घेणाऱ्या अशोक हिरामण मोरे (वय ३९, रा. जाम मोहल्ला, भुसावळ), एजंट जफर शेख उस्मान (वय ३४, रा. रावेर, ह. मु. जाम मोहल्ला, भुसावळ) व विकणारा प्रमोद निलेश कोळी (वय ३७, रा. हुडको कॉलनी, भुसावळ) यांना अटक करुन चौकशीसाठी भुसावळ शहर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. संबंधित फायनान्स कंपनीची फसवणुक करण्यासाठी चोरीचा बनाव करणाऱ्यांचा पर्दाफाश झाल्यानंतर एलसीबीच्या पथकाने दुचाकी घेणाऱ्या अशोक हिरामण मोरे (वय ३९, रा. जाम मोहल्ला, भुसावळ), एजंट जफर शेख उस्मान (वय ३४, रा. रावेर, ह. मु. जाम मोहल्ला, भुसावळ) व विकणारा प्रमोद निलेश कोळी (वय ३७, रा. हुडको कॉलनी, भुसावळ) यांना अटक करुन चौकशीसाठी भुसावळ शहर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

चोरीची दुचाकी ही प्रमोद कोळी याने फायनान्स कंपनीकडून कर्ज घेवून घेतली होती. तीचे हप्ते थकीत असल्याने त्या दुचाकीवर बनावट क्रमांक टाकून एजंट मार्फत अशोक मोरे याला विकली. तसेच ही दुचाकी चोरी झाल्याबाबत प्रमोद कोळी याने पोलिसात देखील तक्रार दिल्याचा त्यांनी बनाव केला होता

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *