Home » जळगाव » तरूणाला शिवीगाळ करत धारदार चाकूने वार

तरूणाला शिवीगाळ करत धारदार चाकूने वार

जळगाव : प्रतिनिधी

हरीविठ्ठल नगरातील धनगरवाडा परिसरात मंगळवारी १० फेब्रुवारी रोजी पैशांवरून एका तरूणाला शिवीगाळ करत धारदार चाकूने वार करून गंभीर दुखापत करत जीवेठार मारण्याची धमकी दिल्याची घटना सकाळी १० वाजता घडली आहे. याबाबत गुरूवारी १२ फेब्रुवारी रोजी रात्री १० वाजता रामानंद नगर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,  भीकन सुरेश चौधरी वय ३७ रा. धनगरवाडा, हरीविठ्ठल नगर, जळगाव हा तरूण आपल्या परिवारासह राहतो. मंगळवारी १० फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता हरीविठ्ठल नगरात उभा असतांना संशयित आरोपी ललित सुभाष इंगळे रा. हरीविठ्ठल नगर, जळगाव याने भीकन यांच्याकडे पैशांची मागणी केली. त्यावेळी त्यांनी पैसे दिले नाही या रागातून संशयित आरोपी ललित इंगळे याने शिवीगाळ करत हातातील धारदार चाकूने वार करून गंभीर दुखापत केली. त्यानंतर जीवेठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी भीकन चौधरी यांनी रामानंद नगर पोलीसात तक्रार दिली. त्यानुसार पोलीस ठाण्यात संशयित आरोपी ललित इंगळे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोहेकॉ प्रविण जगदाळे हे करीत आहे.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *