September 20, 2026 3:41 pm

रुबी हॉलमधून शरद पवारांना डिस्चार्ज; प्रकृतीत सुधारणा, विश्रांतीचा सल्ला

पुणे : वृत्तसंस्था राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) अध्यक्ष Sharad Pawar यांना खोकला व छातीत कफ झाल्याने काही दिवसांपूर्वी पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक येथे दाखल करण्यात आले होते. पाच दिवस उपचार घेतल्यानंतर आज सहाव्या दिवशी त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. रुग्णालयातून व्हीलचेअरवर बसून बाहेर येताना शरद पवार यांनी उपस्थित कार्यकर्ते व समर्थकांना हात दाखवून अभिवादन केले. त्यानंतर […]

‘ट्रम्प मोदींना माकडासारखे नाचवत आहेत’; प्रकाश आंबेडकरांचा आरोप !

मुंबई : वृत्तसंस्था वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान मोदी यांच्याबाबत अत्यंत जहरी टीका केली आहे. “डोनाल्ड ट्रम्प यांनी नरेंद्र मोदी यांना माकड बनवून ठेवले असून ते त्यांना आपल्या तालावर नाचवत आहेत,” असा आरोप आंबेडकर यांनी केला. केंद्रातील रालोआ सरकारने अमेरिकेसोबत केलेल्या व्यापार करारावरून विरोधकांकडून टीका होत असताना आंबेडकर […]

कालिका माता मंदिर परिसरात स्वतंत्र पोलिस ठाण्याची मागणी !

जळगाव : प्रतिनिधी शहरातील कालिका माता मंदिर परिसर आणि आजूबाजूचा भाग हा वेगाने विकसित होणारा परिसर म्हणून ओळखला जात आहे. राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या या भागात योगेश्वर नगर, जुने जळगाव, तळेले कॉलनी, शंकरराव नगर, तुळसाई नगर, प्रेमचंद नगर, ज्ञानदेव नगर, गीताई नगर, काशिनाथ नगर, जमुना नगर, सुंदर नगर, विठोबा नगर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर, राम पेठ, […]

मुंबईत मेट्रो पुलाचा स्लॅब कोसळला; 1 ठार, 3-4 जखमी

मुंबई : वृत्तसंस्था मुलुंड (पश्चिम) परिसरातील एलबीएस रोडवर शनिवारी दुपारी 12.20 च्या सुमारास मेट्रो पुलाच्या स्लॅब कोसळल्याची धक्कादायक घटना घडली. या अपघातात ऑटो व कारवर स्लॅब पडल्याने 3-4 जण जखमी झाले, तर एका जखमीचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृत व्यक्तीची ओळख अद्याप स्पष्ट झालेली नाही. मेट्रो पुलाचे काम सुरू असतानाही या ठिकाणी बॅरिकेट्स किंवा इतर […]

मंत्रालयातच लाचकांड, राजकारण तापले; झिरवाळांवर सावट

मुंबई :  वृत्तसंस्था  राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या कार्यालयातील लाचखोरी प्रकरणावरून राज्याच्या राजकारणात आरोप-प्रत्यारोपांची जोरदार ठिणगी उडाली आहे. या प्रकरणामागे भाजपचा हात असू शकतो, असा संशय काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केला आहे. मंत्री झिरवाळ यांच्या मंत्रालयातील कार्यालयातील लिपिक राजेंद्र ढेरंगे यांना ५० हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने […]

टोमॅटो पिक परिसंवाद उत्साहात, शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

जळगाव : प्रतिनिधी जैन फार्म फ्रेश फूड्स लि. (जैन इरिगेशन सिस्टीम्सची उपकंपनी) आणि कागोमे इंडिया प्रा. लि. यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘टोमॅटो पिक परिसंवाद’ संपन्न झाला. वावडदा-जळके रोडवरील प्रगतशील शेतकरी सुधाकर ओंकार येवले यांच्या शेतात हा कार्यक्रम झाला. शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावून या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने टोमॅटो उत्पादन वाढवण्यासाठी हा […]

तरूणाला शिवीगाळ करत धारदार चाकूने वार

जळगाव : प्रतिनिधी हरीविठ्ठल नगरातील धनगरवाडा परिसरात मंगळवारी १० फेब्रुवारी रोजी पैशांवरून एका तरूणाला शिवीगाळ करत धारदार चाकूने वार करून गंभीर दुखापत करत जीवेठार मारण्याची धमकी दिल्याची घटना सकाळी १० वाजता घडली आहे. याबाबत गुरूवारी १२ फेब्रुवारी रोजी रात्री १० वाजता रामानंद नगर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार,  भीकन सुरेश चौधरी […]

सुसाट डंपरचा कहर; भाजीपाला घेऊन जाणाऱ्या मजुराचा जागीच मृत्यू

जळगाव : प्रतिनिधी भाजीपाला घेऊन घरी निघालेल्या ५६ वर्षीय प्रौढाला सुसाट डंपरने चिरडल्याची हृदयद्रावक घटना शुक्रवारी रात्री सुमारे ८ वाजता काळिंका माता मंदिराजवळ घडली. प्रभाकर रघुनाथ पाटील (रा. तैली चौक, जुने जळगाव) असे मृताचे नाव असून, अपघातानंतर संतप्त जमावाने डंपरची तोडफोड करत प्रशासनाविरुद्ध तीव्र संताप व्यक्त केला. मिळालेल्या माहितीनुसार, प्रभाकर पाटील हे हातमजुरी करून कुटुंबाचा […]

आज तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल, ज्यामुळे एक आनंददायी वातावरण निर्माण होईल.

आजचे राशिभविष्य दि.१४ फेब्रुवारी २०२६ मेष राशी आजचा दिवस तुमच्यासाठी आनंदी मनःस्थितीसह एक अद्भुत दिवस असेल. संयम तुम्हाला नवीन उंची गाठण्यास मदत करेल. तुमच्या ऑटोमोबाईल व्यवसायात तुम्हाला नफा दिसेल. नवीन धार्मिक स्थळाला भेट देण्याचा आनंद तुम्हाला अनुभवायला मिळेल. ऑफीस सहकाऱ्यांसोबत आज सहलीला जाल. प्रशासकीय सेवांमध्ये सहभागी असलेल्या लोकांकडून तुम्हाला फायदा होईल. जवळच्या नातेवाईकांशी तुमचा संवाद […]

error: Content is protected !!