जळगाव : प्रतिनिधी
येथील शिक्षण प्रसारक मंडळ संचालित शेठ ला.ना. सा.विद्यालयात,शनिवार दिनांक 2 3 ऑगस्ट रोजी महाराष्ट्र राज्य शालेय शिक्षण विभागाच्या सूचनेनुसार व उपमुख्याध्यापक श्री.प्रशांत जगताप सर यांच्या संकल्पनेनुसार आनंददायी ,दप्तरमुक्त शाळा भरविण्यात आली.या प्रसंगी शाळेतील शिक्षकांनी विद्यार्थ्यांना. विविध शैक्षणिक साहित्याची ओळख करून दिली.
तसेच विद्यार्थ्यांमधील कृतीशीलतेला वाव मिळावा या हेतूने विविध अभ्यासपूरक उपक्रम घेतले.त्यात घड्याळातील वेळ ओळखणे, अक्षर व संख्या ओळख ,समानअर्थी ,विरुद्धार्थी शब्द ओळखणे,मापनाची एकके,आकृती ओळख,क्राफ्ट पेपरच्या सहाय्याने विविध भौमितिक आकृत्या साकारणे आदी क्रिया विविध शैक्षणिक साहित्य वापरून आनंददायी,हसत,खेळत शिक्षण देण्यात आले.या उपक्रमास विद्यार्थी व शिक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री सचिन देशपांडे सर,उपमुख्याध्यापक श्री.प्रशांत जगताप सर,जेष्ठ पर्यवेक्षक श्री संजय वानखेडे सर,पर्यवेक्षिका सौ. रमा तारे व सर्व शिक्षक शिक्षकेतर बंधू भगिनींनी सहकार्य केले.
