Home » जळगाव » अल्पवयीन मुलीने दिला बाळाला जन्म : अखेर गुन्हा दाखल !

अल्पवयीन मुलीने दिला बाळाला जन्म : अखेर गुन्हा दाखल !

चोपडा : प्रतिनिधी

अत्याचारातून सोळा वर्षीय अल्पवयीन मुलगी गर्भवती झाल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या फिर्यादीवरुन चोपडा ग्रामीण पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,  तालुक्यातील एका गावात राहणारी सोळा वर्षीय अल्पवयीन मुलगी दोन वर्षांपुर्वी बाजारात गेलेली होती. तेथे तीची संशयित दीपक भिल याच्यासोबत ओळख झाल्यानंतर तो मुलीच्या घरी ये-जा करीत होता. दीड वर्षांपुर्वी संशयिताने मुलीला लवण मध्ये चल असे सांगत तीला फूस लावून पळवून नेले. त्यानंतर ती अल्पवयीन असल्याचे माहिती असतांना देखील त्याने तिच्यावर अत्याचार केला. या अत्याचारातून अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिली असून तीने दि. २४ रोजी राहत्या घरी बाळाला जन्म दिला. दरम्यान, पीडित मुलीने पोलिसात तक्रार दिल्यानंतर उपनिरीक्षक कविता ढाणगे यांनी पीडितेचा जबाब नोंदवून घेतला. त्यानुसार संशयित दीपक भिल याच्याविरुद्ध पोक्सोंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सपोनि शेषराव नितनवरे करित आहे.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *