जळगाव : प्रतिनिधी
शहरातील आकाशवाणी चौकात दि. १७ ऑगस्ट रोजी एका राजकीय पक्षाच्या नेत्याच्या स्वागतासाठी लावण्यात आलेले भलेमोठे बेकायदेशीर होर्डिंग अखेर ‘पब्लिक Live’ने केलेल्या वृत्तप्रसारणानंतर हटवण्यात आले असून, संबंधित व्यक्तीवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्तानुसार, १७ ऑगस्ट रोजी मनपाच्या परवानगीशिवाय आकाशवाणी चौकात एका राजकीय नेत्यानुसार भव्य होर्डिंग लावण्यात आले होते. मनपाचे नियम धाब्यावर बसवत लावलेले हे होर्डिंग बेकायदेशीर असल्याने, ‘पब्लिक Live’ने या प्रकरणाची गंभीर दखल घेत बातमी प्रसिद्ध केली होती. या बातमीनंतर १९ ऑगस्ट रोजी जळगाव महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने तात्काळ कारवाई करत संबंधित व्यक्तीला ९,९१२ रुपयांचा दंड ठोठावला. या कारवाईमुळे बेकायदेशीर जाहिरात फलकांवर व मनपाच्या नियमांतील ढिलाईवर लक्ष ठेवण्याची गरज अधोरेखित झाली आहे.
