Home » महाराष्ट्र » कोणताही तोडगा निघाला नाही : राज ठाकरे काढणार मोर्चा !

कोणताही तोडगा निघाला नाही : राज ठाकरे काढणार मोर्चा !

मुंबई : वृत्तसंस्था

गेल्या काही दिवसापासून राज्यात मराठी – हिंदी भाषेवरून वाद सुरु असून आता शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांची नुकतेच मनसे प्रमुख राज ठाकरेंसोबत पहिलीपासून हिंदी भाषेच्या सक्तीसंदर्भात चर्चा झाली. मात्र या बैठकीत कोणताही तोडगा निघाला नाही, अशी माहिती दादा भुसे यांनी दिली. त्यानंतर राज ठाकरेंनी पत्रकार परिषद घेतली.

यावेळी राज ठाकरे यांनी मराठी माणसासाठी ६ जुलैला गिरगावहून मोर्चा काढणार आहे. प्रत्येक मराठी माणसाने या मोर्चामध्ये सहभागी व्हा, सरकारच्या या निर्णयाविरुद्ध सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येण्याचे आवाहनही राज ठाकरेंनी केले आहे, असे आवाहन केले आहे.

हिंदी असेल किंवा इतर कोणत्या ही भाषेची सक्ती राहणार नाही. मी सर्व पक्षांना आवाहन करत आहे की, येत्या 6 जुलैला आम्ही गिरगाववरून मोर्चा काढायचे ठरवरलं आहे. या मोर्चात कोणताही झेंडा नसेल, हा मराठी माणसाचा मोर्चा असेल,  6 जुलै रोजी सकाळी 10 वाजता हा मोर्चा निघेल, अशी घोषणा राज ठाकरेंनी यावेळी केली.

 

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *