Home » जळगाव » जळगावात अवैध सावकारी प्रकरणी अधिकाऱ्यांची धाड !

जळगावात अवैध सावकारी प्रकरणी अधिकाऱ्यांची धाड !

जळगाव : प्रतिनिधी

विनापरवाना अवैध सावकारी केल्याप्रकरणी जळगाव शहरातील श्रीकृष्ण कॉलनीमधील रहिवासी मनोज व कल्पना वाणी यांच्याकडे नुकतीच धाड टाकण्यात आली. कारवाईत सौदा पावती, खरेदीखत जप्त करण्यात आले आहे.

सावकारांचे जिल्हा निबंधक तथा सहकारी संस्था जिल्हा उपनिबंधक गौतम बलसाणे यांच्या मार्गदर्शनात महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०२४ चे कलम १६ अन्वये पोलिस बंदोबस्तात धाडीची कारवाई करण्यात आली. यात वाणी यांच्याकडून ३ सौदा पावती, ९ खरेदी खत जप्त करण्यात आले आहेत. कारवाई करणाऱ्या पथकात सहकारी संस्थांचे तालुका जळगाव उपनिबंधक धर्मराज पाटील, पथक प्रमुख सहायक निबंधक (भडगाव) महेश कासार यांच्यासह आर. आर. पाटील, विक्रांत म्हस्के, फकिरा तडवी, प्रिया कराळे यांचा समावेश होता. अहवाल तयार करणार असून, त्याआधारे पुढील कार्यवाही केली जाणार आहे.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *