Home » जळगाव » बनावट नोटा प्रकरणी पोलिसांनी डॉक्टराला घेतल्या ताब्यात !

बनावट नोटा प्रकरणी पोलिसांनी डॉक्टराला घेतल्या ताब्यात !

जळगाव : प्रतीन्दीही

भंगार विक्रेत्याकडून जप्त केलेल्या नकली नोटा प्रकरणात आतापर्यंत पाच संशयितांना अटक केली होती. तर या बनावट नोटांचे कनेक्शन हे मध्यप्रदेशातील बऱ्हाणपुरपर्यंत पोहचले होते. जिल्हापेठ पोलिसांकडून त्यांचा कसून शोध घेतला जात होता, मात्र ते पाच महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देत होता. मात्र बनावट नोटांचे सिंडीकेट चालविणाऱ्या डॉ. प्रतिक सुरेश नवलखे (वय ४३, रा. बऱ्हाणपूर, मध्यप्रदेश) याला अटक करण्यात आली असून त्याचे धागेदोरे हे पश्चिम बंगालपर्यंत पोहचण्याची शक्यता आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बनावट नोटा चलणात आणणाऱ्या चेतन सावकारे याच्या जिल्हापेठ पोलिसांनी मुसक्या आवळल्या. त्याच्याकडून पाचशे रुपयांच्या ९८ हजार ५०० रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या होत्या. याप्रकरणाचा तपास करतांना नईम शेख बदरुद्दीन, नरजील नासीर खान रा. जामनेर व तोंडापूर येथील गणी मजीद शेख, मोहम्मद हकीम यांना अटक करण्यात आली होती. तर जुबेर असरफ अन्सारी यांना अटक करण्यात आली होती. या गुन्ह्यातील तपासाचे धागे मध्यप्रदेशापर्यंत पोहचल्यानंतर त्यांनी मोहम्मद हकीम आमीनची कसून चौकशी केली असता, तो रेकॉर्डवरील गुन्हेगार होता. तर त्याचा साथीदार जुबेर असरफ असन्सारी हा मात्र अद्याप फरार असून त्याचा पोलिसांकडून शोध घेतला जात आहे. तपास सपोनि मिरा देशमुख करीत आहेत.

बनावट नोटांचे सिडर्डीकेट चालविणारा प्रतिक नवलखे याचे एमबीबीएसपर्यंतचे शिक्षण झाले असून तो डॉक्टर आहे. शासकीय रुग्णालयात कार्यरत असतांना तेथील साहित्याची अफरातफर केल्याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध तीन फसवणूकीचे गुन्हे दाखल आहे. या गुन्ह्यात कारागृहात असतांना त्याची बनावट नॉटोच सिडीकेट चालविणाऱ्यांशी ओळख झाली आणि ते यामध्ये सामिल झाल्याचे पोलिसांच्या तपासात उघड झाले आहे. दरम्यान, या बनावट नोटांचे धागेदोरे हे आता पश्चिम बंगालपर्यंत पोहचण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पोलिसांनी खंडवा कारागृहातून ताब्यात घेतलेल्या मोहम्मद हकीम आमीन याची चौकशी केली असता, त्याने या बनावट नोटा मध्यप्रदेशात डॉक्टर असलेल्या प्रतिक सुरेश नवलखे (वय ४३, रा. ब-हाणपूर, मध्यप्रदेश) याच्याकडून घेतल्याचे सांगितले होते. परंतु गेल्या पाच महिन्यांपासून जिल्हापेठ पोलिसांचे पथक बनावट नोटा पुरविणाऱ्या डॉक्टरच्या मागावर होते. दरम्यान, दि. ४ रोजी डॉ. प्रतिक सुरेश नवलखे याला अटक केली असून त्याला दि. ९ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *