Home » जळगाव » मुदतठेवीत दुप्पट परताव्याचे आमिष; निवृत्त पोलिस महिलेची साडेतीन लाखांची फसवणूक

मुदतठेवीत दुप्पट परताव्याचे आमिष; निवृत्त पोलिस महिलेची साडेतीन लाखांची फसवणूक

जळगाव : प्रतिनिधी

मुदतठेवीमध्ये गुंतवणूक केल्यास त्यातून दुप्पट रक्कम देण्याचे आमिष दाखवून शांताबाई नामदेव कापरे (७६, रा. दांडेकर नगर, पिंप्राळा) या निवृत्त पोलिस महिलेची साडेतीन लाख रुपयांमध्ये फसवणूक करण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार, पिंप्राळा परिसरातील दांडेकर नगरात राहणाऱ्या शांताबाई कापरे या सन २००५मध्ये पोलिस दलातून सेवानिवृत्त झाल्या आहे. निवृत्तीवेळी त्यांना पाच लाख ५० रुपये मिळालेले होते. मे २०१५ ते जुलै २०१५ मध्ये विकास शंकर चौधरी (रा. संत मीराबाईनगर) व दीपक यश चौधरी (रा. पिंप्राळा) हे त्यांना आठ ते दहा वेळा भेटले व आपण अर्थत फोरयु इंफ्रा अॅन्ड लि. कंपनीचे प्रतिनिधी असून मुदतठेवीत पैसे गुंतविल्यास दुप्पट रक्कम मिळेल, असे सांगितले. २७जुलै २०१५ रोजी कंपनीचे व्यवस्थापक सचिन कांबळे हे आले व त्यांनीही ही माहिती दिली. त्यानंतर निवृत्त महिलेने तीन लाख ५० हजार रुपये त्यांना रोख स्वरुपात दिले होते.

ठेवीची मुदत पूर्ण झाल्यामुळे कापरे यांनी व्यवस्थापक कांबळे यांच्याशी संपर्क साधला. परंतु ते कॉल घेत नव्हते. त्यामुळे त्यांनी एजंट दीपक चौधरी आणि विलास चौधरी यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी तुमचे पैसे लवकर मिळतील असे सांगितले. बरेच वर्ष होऊनही रक्कम मिळत नसल्याने कापरे यांनी रामानंद नगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून व्यवस्थापक सचिन कांबळे, एजंट विकास चौधरी व दीपक चौधरी या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपनिरीक्षक संजय तडवी करीत आहेत.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *