Home » जळगाव » भुसावळ » सेवा निवृत्त रेल्वे कर्मचाऱ्याला १९ लाखात फसविले !

सेवा निवृत्त रेल्वे कर्मचाऱ्याला १९ लाखात फसविले !

भुसावळ : प्रतिनिधी

डिजिटल युगात फसवणुकीच्या नवनवीन पद्धती वापरून नागरिकांना गंडा घालणाऱ्या सायबर गुन्हेगारांनी ‘डिजिटल अरेस्ट’ या नव्या क्लृप्तीचा वापर करत भुसावळ येथील एका सेवानिवृत्त रेल्वे कर्मचाऱ्याला तब्बल १९ लाख ९५ हजार रुपयांहून अधिक रकमेला गंडा घातल्याची धक्कादायक घटना बुधवार, दि. २४ सप्टेंबर रोजी उघडकीस आली आहे.

सविस्तर वृत्त असे कि, सुरेश नथ्थुम धांडे (वय ६९, रा. प्रोफेसर कॉलनी, भुसावळ) हे रेल्वे विभागातून सेवानिवृत्त झालेले आहेत. ते या फसवणुकीचे बळी ठरले आहेत. १७ ते २३ सप्टेंबरदरम्यान, त्यांना अनोळखी मोबाइल क्रमांकावरून आणि व्हॉट्सअॅपवरून कॉल आणि व्हिडीओ कॉल आले. सायबर चोरट्यांनी धांडे यांना, त्यांचे आधारकार्ड मुंबईतील अंधेरी येथील एका बँकेच्या एका खात्याशी लिंक आहे आणि त्या खात्यामध्ये २ कोटी ५० लाख रुपये हे ‘अतिरेक्यांनी’ पाठवले असल्याचे सांगितले होते.

धांडे आणि त्यांच्या पत्नीला व्हिडीओ कॉलवर समोर बसवून, त्यांना घराचे दरवाजे, खिडक्या बंद करण्यास सांगण्यात आले. ‘तुम्हाला आणि तुमच्या मुलाला अटक केली जाईल. आम्ही विचारल्याशिवाय व्हिडीओ कॉल बंद करायचा नाही, कुठे जायचे नाही, अशी धमकी दिली. या भीतीपोटी धांडे यांनी आरोपींच्या सूचनांचे पालन केले. आरोर्पीनी त्यांना त्यांच्या ‘बैंक ऑफ इंडिया’मधील खात्यातून १९ लाख २५ हजार रुपये ‘आरटीजीएस’द्वारे लुधियाना येथील सिटी युनियन बँकेच्या एका खात्यात तात्काळ ट्रान्सफर केले. धांडे यांनी दुसऱ्या दिवशी सायबर पोलिस स्टेशनला धाव घेऊन तक्रार दाखल केली. पुढील तपास पोलिस निरीक्षक सतीश गोराडे हे करत आहेत.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *