Home » जळगाव » जळगाव महसूल प्रशासनाच्या नाकावर टिच्चून होते वाळूचोरी !

जळगाव महसूल प्रशासनाच्या नाकावर टिच्चून होते वाळूचोरी !

आकाशवाणी चौकात वाळूचोर देतात रात्रभर पहारा

जळगाव : प्रतिनिधी

जळगाव शहरालगत असलेल्या गिरणा नदी पात्रातून रात्रीच्या सुमारास वाळू चोरी मोठ्या प्रमाणात सुरु झाली आहे. जिल्ह्यातील कुठल्याही गावात सध्या स्थितीत वाळू उपलब्ध होत आहे. तर महसूल प्रशासन नेहमीच म्हणते कि जिल्ह्यात वाळू चोरी होत नसल्याचा दावा करीत आहे. मात्र जळगाव शहरातील आकाशवाणी चौकातून महसूल प्रशासनाच्या नाकावर टिचून रात्री १० वाजेपासून ते पहाटेपर्यत या मार्गाने वाळू चोरी होत आहे.

गेल्या काही महिन्यापासून महामार्गावर अपघाताच्या घटना वाढत असतांना या अपघातांना वाळूच्या डंपरने धडक दिल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहे. मात्र जळगाव महसूल प्रशासन कुठलीही कारवाई करीत नाही तर जळगावकर जनतेला महामार्गावर वाहन चालविताना मुठीत जीव घेवून प्रवास करावा लागत आहे. जणू काही प्रशासन जळगावकरांचा जीव घेण्यासाठी उत्सुक आहे का असा प्रश्न सध्या सर्वत्र चर्चिला जात आहे.

आकाशवाणी चौकात भरते वाळूचोरांची जत्रा

शहरातील आकाशवाणी चौकात नेहमीच अपघाताच्या घटना होत असतांना व या चौकापासून ५०० मिटरच्या अंतरावर जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांच्यासह सर्वच अधिकारी यांचे निवासस्थान असल्याने मध्यरात्री अचानक वाळूच्या डंपरवर कारवाई होवू नये यासाठी वाळूचोर या चौकात रात्री १० ते पहाटे ८ वाजेपर्यत आपल्या गाड्या पास करण्यासाठी पहारा देत असतात. या महामार्गावर पोलीस व अधिकाऱ्यांच्या गाड्या दिसताच वाळू वाहतूक करणारे डंपर थांबविले जात असतात.

सावखेडा व निमखेडीतून होते वाळू उत्खनन

शहरापासून जवळ असलेल्या गिरणा नदी पात्राला लागून असलेले सावखेडा व निमखेडी या गावातून रात्री ८ वाजेपासून वाळूचे डंपर भरण्यास सुरुवात होत असते. व रात्री १० वाजेनंतर सर्व अधिकार्यांचे लोकेशन बघून खोटेनगर पुलावरून थेट मानराज पार्क,  शिव कॉलनी मार्ग आकाशवाणी चौकातून अवैध वाळूचे डंपर भरधाव वेगात जात असते. याकडे महसूल प्रशासन केवळ बघ्याची भूमिका घेत आहे.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *