Home » राष्ट्रीय » नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या अनुदान वाटपात घोटाळा ; कॉंग्रेस नेत्यांचा हल्लाबोल !

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या अनुदान वाटपात घोटाळा ; कॉंग्रेस नेत्यांचा हल्लाबोल !

मुंबई : वृत्तसंस्था

राज्यातील महाविकास आघाडी विरोधी बाकावर असून सरकारवर अंकुश ठेवण्यासाठी मोठे प्रयान्त करीत असताना आता गेल्या काही महिन्यात मराठवाड्यात विशेषतः जालना जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी आणि गारपिटीने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या अनुदान वाटपात घोटाळा करून 35 कोटी हडप केल्याचा आरोप केला जात आहे. यावरुन काँग्रेसचे नेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.

या संदर्भात विजय वडेट्टीवार यांनी एका पोस्टच्या माध्यमातून या प्रकरणाची माहिती शेअर केली आहे. जालना जिल्ह्यातील 26 तलाठ्यांनी अतिवृष्टी आणि गारपिटीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या अनुदान वाटपात घोटाळा करून 35 कोटी हडप केल्याचा आरोप यात करण्यात आला आहे. तसेच ज्या तलाठ्यांनी हा भ्रष्टाचार केला त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे, या तलाठ्यांकडून वसुली करून शेतकऱ्यांचा पैसा त्यांना मिळायला हवा अशी मागणी देखील त्यांनी केली आहे.

सरकार आणि प्रशासनाला शेतकऱ्यांच्या मढ्याच्या टाळूवरचे लोणी पण खायला कमी? जालना जिल्ह्यातील 26 तलाठ्यांनी अतिवृष्टी आणि गारपिटीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या अनुदान वाटपात घोटाळा करून 35 कोटी हडप केल्याची घटना पुढे आली आहे. सरकार आणि प्रशासनात पैसे खाण्यासाठी शेतकऱ्यांचा वापर कसा होत आहे ह्याचे हे उत्तम उदाहरण आहे. ज्या तलाठ्यांनी हा भ्रष्ट्राचार केला त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे, या तलाठ्यांकडून वसुली करून शेतकऱ्यांचा पैसा त्यांना मिळायला हवा ही आमची मागणी आहे.

नेमके काय?

जालना‎ जिल्ह्यातील अंबड व घनसावंगी‎तालुक्यातील अतिवृष्टी अनुदान‎घोटाळ्याचा अंतिम अहवाल‎चौकशी समितीने जिल्हाधिकाऱ्यांना‎सादर केला आहे. यात ३४ कोटी ९७‎लाख रुपयांचा घोटाळा झाल्याचे‎तपासात समोर आले आहे.‎समितीच्या तपासात २६ कर्मचारी‎दोषी आढळले असून अंबड‎तालुक्यातील १५ तर घनसावंगी‎ तालुक्यातील ११ कर्मचाऱ्यांचा यात‎ समावेश आहे. या ३४ कोटी ९७ लाख रुपयांपैकी आतापर्यंत एकूण ५‎ कोटी ७४ लाख रुपयांची वसुली‎ झाली असल्याची माहिती ‎जालन्याचे जिल्हाधिकारी डॉ.‎ श्रीकृष्ण पांचाळ यांनी पत्रकार‎ परिषदेत दिली.‎ या प्रकरणाचा तपास पूर्ण‎केल्यानंतर समितीने आपला‎ अहवाल मंगळवारी‎ जिल्हाधिकाऱ्यांना सादर केला आहे.‎ याप्रकरणी चौकशी समितीने ७९‎कोटींची रक्कम अपेक्षित काढली ‎होती. त्यापैकी ७२ कोटी रुपयांची ‎समितीने चौकशी केली असून ३४‎ कोटी ९७ लाख रुपयांचा अपहार ‎झाला असल्याचे या चौकशीत ‎निष्पन्न झाल्याची माहिती ‎जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.‎

ग्राम महसूल अधिकारी‎ गणेश मिसाळ, कैलास घारे, विठ्ठल ‎गाडेकर, बाळू सानप, पवन सुलाने,‎ शिवाजी ढालके, कल्याण‎ बमनावत, सुनील सोरमारे, अल्ताफ‎ शेख, माेहित गौषिक,चंद्रकांत ‎खिल्लारे, डी. जी. कुरेवाड, किरण‎ जाधव, रमेश कांबळे, कृषी‎ सहायक बी. पी. हरणे, ग्राम महसूल‎ अधिकारी प्रवीण शिनगारे, कृषी ‎सहायक मयूर सुलताने, ग्राम‎ महसूल सहायक बी.आर.भुसारे, ‎ग्रामसेवक डी. एल. लहामगे, एम.‎टी. रुपनर आदींचा समावेश आहे. ‎यापैकी कृषी सहायक व ग्रामसेवक‎ यांना सुनावणीची संधी देऊन ‎खुलासा मागवणे बाकी आहे.‎

 

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *