Home » राष्ट्रीय » रुबी हॉलमधून शरद पवारांना डिस्चार्ज; प्रकृतीत सुधारणा, विश्रांतीचा सल्ला

रुबी हॉलमधून शरद पवारांना डिस्चार्ज; प्रकृतीत सुधारणा, विश्रांतीचा सल्ला

पुणे : वृत्तसंस्था

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) अध्यक्ष Sharad Pawar यांना खोकला व छातीत कफ झाल्याने काही दिवसांपूर्वी पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक येथे दाखल करण्यात आले होते. पाच दिवस उपचार घेतल्यानंतर आज सहाव्या दिवशी त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. रुग्णालयातून व्हीलचेअरवर बसून बाहेर येताना शरद पवार यांनी उपस्थित कार्यकर्ते व समर्थकांना हात दाखवून अभिवादन केले. त्यानंतर ते गाडीतून पुण्यातील Modi Baug येथील निवासस्थानी रवाना झाले. पुढील काही दिवस ते तेथेच विश्रांती घेणार असल्याची माहिती मिळाली आहे.

रुबी हॉल क्लिनिकमधील डॉक्टरांनी सांगितले की, “शरद पवार यांच्या छातीत संसर्ग झाला होता. त्यावर अँटीबायोटिक्स देण्यात आली असून त्याचा सकारात्मक परिणाम झाला आहे. त्यांच्या प्रकृतीत आता चांगली सुधारणा झाली आहे. त्यामुळे आज त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.” डॉक्टरांनी पुढे सांगितले की, पवार आता पूर्णपणे बरे झाले असले तरी पुढील तीन ते चार दिवस पूर्ण विश्रांती घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. त्यानंतर ते प्रवास करू शकतील. दरम्यान, पवार यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याची बातमी समोर आल्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये समाधान व्यक्त करण्यात आले आहे.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *