Home » महाराष्ट्र » बच्चू कडू यांच्या आंदोलनाचा चौथ्या दिवशी शरद पवारांचा फोन !

बच्चू कडू यांच्या आंदोलनाचा चौथ्या दिवशी शरद पवारांचा फोन !

अमरावती : वृत्तसंस्था

राज्यातील प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक आणि माजी आमदार बच्चू कडू यांनी शेतकरी, शेतमजूर, दिव्यांग आणि इतर समाजघटकांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. अमरावती जिल्ह्यातील गुरुकुंज मोझरी येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या समाधी परिसरात त्यांनी 8 जून 2025 पासून बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. त्यांच्या आंदोलनाचा आजचा चौथा दिवस आहे. अनेकांनी त्यांच्या आंदोलनला समर्थन दर्शवले आहे.

बच्चू कडू यांचे हे आंदोलन शेतकरी आणि दुर्बल घटकांच्या प्रश्नांना वाचा फोडणारे आहे. त्यांच्या आक्रमक पवित्र्यामुळे आणि मोठ्या संख्येने समर्थकांच्या सहभागामुळे सरकारवर दबाव वाढत असून, स्थानिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हे आंदोलन राजकीयदृष्ट्या देखील महत्चाचे मानले जात आहे. दरम्यान, बच्चू कडू यांच्या आंदोलनाला राज्यभरातून पाठिंबा मिळत आहे. तसेच राजकीय वर्तुळातून अनेक नेत्यांनी देखील त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला आहे.

शरद पवारांकडून विचारपूस 

नुकतेच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी बच्चू कडू यांच्याशी फोनवरून संवाद साधला. शरद पवारांनी बच्चू कडूंना प्रकृती जपण्याचा सल्ला दिला आहे. तसेच कराळे मास्तरांनी देखील बच्चू कडू यांच्याशी फोनवरून बोलणं केले आहे. अशातच आज राज्यातील इतर नेते कडूंच्या आंदोलन स्थळाला भेट देणार असल्याची माहिती आहे. बच्चू कडू यांनी आंदोलनाच्या माध्यमातून सरकारकडे १७ प्रमुख मागण्या केल्या आहेत.

या आहेत प्रमुख मागण्या

  1. शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी.
  2. दिव्यांग व विधवा महिलांना रु. 6000/- मानधन देण्यात यावे.
  3. आपत्कालीन संकटमुळे शेतकऱ्यांना संपूर्ण कर्ज माफ करून देण्यात यावे तसेच शेतमालाला MSP (किमान दर) वर 20% अनुदान देण्यात यावे.
  4. दिनांक 06 एप्रिल 2023 रोजी झालेल्या बैठकीच्या इतिबृत्तानुसार शासन निर्णय काढण्यात यावे.
  5. वंचित घटकांना वगळता सर्व गोरगरीब समांतर राहणाऱ्या व सन्मानजनक वागणूक हवी असलेल्या व सध्या विविध अडचणीत असलेल्या घटकांनाही सन्मानजनक घरकुल द्यावे.
  6. शहरासारख्या ग्रामीण भागातील घरकुलासाठीही समान निकष लागू करून किमान रु. 5 लाख अनुदान घरकुल लाभार्थ्यांना देण्यात यावे.
  7. आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना स्वतंत्र मंडळ स्थापून रु. 10 लाख आर्थिक मदत व संपूर्ण कर्जमाफी द्यावी.
  8. रोजंदारी करणाऱ्या सर्व मजुरांना MREGS मध्ये घेण्यात यावे तसेच फळपीकांत 3:5 प्रमाण लागू करून MREGS मध्ये जोडण्यात यावे. दररोज होणाऱ्या श्रमाच्या बदल्यात रु. 1000/- मजुरी दिली जावी.
  9. संजय गांधी योजनेत पात्र लाभार्थ्यांना तात्काळ संपूर्ण मंजूर रक्कम देण्यात यावी.
  10. शेतकऱ्यांच्या मुला-मुलींना स्वतंत्र शिष्यवृत्ती योजना लागू करून उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती द्यावी.
  11. 100% दिव्यांग व अपंग व्यक्तींना शासकीय नोकरीत 5% आरक्षण देण्यात यावे.
  12. शासकीय नोकर भरतीत इतर मागास प्रवर्ग (OBC) चे आरक्षण 27% ठेवावे.
  13. शेतमाल विमा योजनेचा लाभ थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर द्यावा. विमा हप्त्याचे 50% पेक्षा जास्त शुल्क शासनाने द्यावे.
  14. शेतकऱ्यांना खत, बियाणे विनाशुल्क द्यावे.
  15. शेतीसाठी लागणाऱ्या वीजेचे बील माफ करून सतत वीजपुरवठा करण्यात यावा.
  16. शेतमालास हमी भाव मिळत नसल्यामुळे शेतकरी आत्महत्या करत आहेत. शासकीय खरेदी केंद्रावर हमीभावाने शेतमालाची खरेदी करावी.
  17. धनगर समाजाचे आरक्षण तत्काळ लागू करून धनगर समाजातील बेरोजगार तरुणांना नोकरीत 13% आरक्षण द्यावे.

 

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *