Home » जळगाव » शॉक लागला अन खांब्यावरून पडून ३६ वर्षीय ‘वायरमन’चा दुर्दैवी मृत्यू

शॉक लागला अन खांब्यावरून पडून ३६ वर्षीय ‘वायरमन’चा दुर्दैवी मृत्यू

धरणगाव : प्रतिनिधी

शहरातील महावितरण कार्यालयात ठेकेदारी पद्धतीने ‘वायरमन’ म्हणून काम करणाऱ्या एका ३६ वर्षीय तरुणाचा शॉक लागल्यानंतर इलेक्ट्रिक खांब्यावरून पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी, २५ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजता घडली. कामावर असताना झालेल्या या अपघातामुळे दिलीप देवा भिल (वय ३६, रा. गारखेडा, ता.धरणगाव) या तरुणाला आपला जीव गमवावा लागला.

दिलीप भिल धरणगाव शहरातील लोहार गल्ली परिसरामध्ये इलेक्ट्रिक खांबावर काम करण्यासाठी गेला होता. सकाळी ९ वाजता भिल खांबावर चढून काम करत असताना, अचानक तो जमिनीवर कोसळला. खांबावरून पडल्याने भिल याला गंभीर दुखापत झाली. त्याच्यासोबत काम करणाऱ्या सहकाऱ्यांनी त्याला तत्काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीअंती दिलीप भिल याला मृत घोषित केले. या अपघाताची माहिती मिळताच दिलीपच्या आई-वडील, पत्नी आणि नातेवाईकांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडे धाव घेतली.

मयत तरुणाच्या कुटुंबीयांना महावितरणकडून भरीव आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी एकलव्य संघटनेने केली आहे. संघटनेचे जिल्हाध्यक्ष बापू मोरे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी आणि नातेवाइकांनी जोपर्यंत ही मागणी पूर्ण होत नाही आणि ठोस आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत दिलीपचा मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा घेतला आहे. रात्री देखील जिल्हा रुग्णालयात नातेविकांनी मृतदेह स्वीकारला नाही. शुक्रवारी, आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *