Home » जळगाव » चाळीसगाव » धक्कादायक : ४५ वर्षीय बसचालकाने घेतला टोकाचा निर्णय !

धक्कादायक : ४५ वर्षीय बसचालकाने घेतला टोकाचा निर्णय !

चाळीसगाव : प्रतिनिधी

तालुक्यातील पोहरे येथे बसचालकाने दोरीच्या सहाय्याने गळफास घेतल्याची घटना आज दि २ रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी मेहूणबारे पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पोहरे येथील रहिवासी एसटी बसचालक भास्कर सोमा माळी (वय ४५) हे मेहूणबारे गावी कुटुंबासह राहत होते. शेतीच्या कामासाठी ते १५ दिवसापासून पोहरे येथे राहत होते. दि.२ रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास भास्कर माळी यांचे भाऊ अशोक माळी हे घरात ठेवलेले खत घेण्याकरीता गेले असता घराचा दरवाजा उघडा दिसल्याने त्यांनी आवाज दिला. बराच वेळ झाला तरी भास्कर माळी हे दरवाजा उघडत नसल्याने भाऊ व घराशेजारी लोकांनी दरवाजा उघडला असता भास्कर माळी हे दरवाजाला लागून असलेल्या भिंतीतील लाकडी खुंटीला दोरीच्या सहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले. अशोक सोमा माळी यांनी खबर दिल्यावरून मेहूणबारे पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *