तुम्ही राज्याचे तुकडे करणारे लोकं ; संजय राऊत !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील मराठी भाषेसंदर्भात आम्ही हिंसाचार करणार म्हणजे करणार काय उखडायचे ते उखाडा. देवेंद्र फडणवीस हा महाराष्ट्र आहे, हे मराठी माणसांचे राज्य आहे. आमच्या बापजाद्यांनी (106 हुतात्मांनी) संयुक्त महाराष्ट्रासाठी बलिदान दिले आहे, तुम्ही दिले नाही, असे म्हणत उबाठाचे नेते संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकास्त्र डागले आहे. संजय राऊत पुढे बोलताना […]
जळगाव रेल्वे स्थानकावर महिला वकिलाचा अपघाती मृत्यू !

जळगाव : प्रतिनिधी जळगाव स्थानकावर थांबा नसलेल्या मंगला एक्सप्रेसमधून उतरताना झालेल्या अपघातात अॅड. वर्षा साहेबराव बिऱ्हाडे (गायकवाड) यांना गंभीर दुखापत झाली होती. डोक्यावर जोरात घाव बसल्यामुळे त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचार सुरू असतानाच शुक्रवारी रात्री त्यांची प्राणज्योत मालवली. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील भोईटे नगर येथे राहणाऱ्या अॅड. बिऱ्हाडे या जळगाव व कल्याण येथे […]
उमाळ्यानजीक भीषण अपघातात जळगावातील तरुण ठार !

जळगाव : प्रतिनिधी जामनेर तालुक्यातील नेरी येथे मासे घेण्याकरीता जात असलेल्या साहिल मोहम्मद खाटीक (वय-२३, रा. बिलाल चौक तांबापुरा) या तरुणाला भरधाव काँक्रीट मिक्सरने चिरडले. ही घटना मंगळवार दि. २ रोजी सकाळच्या सुमारास जळगाव तालुक्यातील उमाळा गावाजवळ घडली. तरुणाचा मृतदेह जिल्हा रुग्णालयात आणल्यानंतर याठिकाणी त्याच्या कुटुबियांनी एकच आक्रोश केला. सविस्तर वृत्त असे कि, शहरातील तांबापुरा […]
धक्कादायक : ४५ वर्षीय बसचालकाने घेतला टोकाचा निर्णय !

चाळीसगाव : प्रतिनिधी तालुक्यातील पोहरे येथे बसचालकाने दोरीच्या सहाय्याने गळफास घेतल्याची घटना आज दि २ रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी मेहूणबारे पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पोहरे येथील रहिवासी एसटी बसचालक भास्कर सोमा माळी (वय ४५) हे मेहूणबारे गावी कुटुंबासह राहत होते. शेतीच्या कामासाठी ते १५ दिवसापासून […]
खळबळजनक : जवानाचा मोबाइल हॅक करून आठ लाखांत फसवणूक !

जळगाव : प्रतिनिधी सैन्य दलातील शिपायाचा मोबाइल हॅक करून त्यांच्या बँक खात्यातून परस्पर आठ लाख पाच हजार रुपये काढून घेत फसवणूक करण्यात आली. विजय चिंधा राजपूत (४०, रा. चाळीसगाव) असे फसवणूक झालेल्यांचे नाव आहे. विशेष म्हणजे मोबाइलचा ताबा घेत परस्पर राजपूत यांच्या नावे सात लाख ४३ हजार रुपये ऑनलाइन कर्ज मंजूर करून घेत सायबर गुन्हेगाराने […]
कारमध्ये बसवून वृद्धाची केली लुट ; दोन संशयित ताब्यात !

जळगाव : प्रतिनिधी पुढच्या चौकात सोडतो, असे सांगत भास्कर शंकर पाटील (७०, रा. पहूर, ता. जामनेर) यांना कारमध्ये बसवून त्यांच्या खिशातून २५ हजारांची रोकड लांबविण्यात आली. ही घटना १ ऑगस्ट रोजी कालिंका माता चौफुली ते अजिंठा चौफुलीदरम्यान घडली. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी अर्शद शेख रज्जाक (३०, रा. गेंदालाल मिल) व अतऊर रहेमान मोहम्मद सलीम (३४, […]
बंद घरात अल्पवयीन मुलीवर अत्याचार !

चोपडा : प्रतिनिधी लघुशंकेसाठी रात्री घराच्या बाहेर अंगणात गेलेल्या अल्पवयीन मुलीवर पाळत ठेवणाऱ्या गावातील तरुणाने मुलीचे तोंड दाबून एका बंद घरात तिच्यावर अत्याचार केल्याची घटना नुकतीच तालुक्यातील एका गावात घडली. या संशयित तरुणाला पोलिसांनी शुक्रवारी रात्रीच ताब्यात घेऊन अटक केली. सातपुड्यातील एका गावात आदिवासी कुटुंब मुलाबाळांसह वास्तव्यास असून ३१ जुलै रोजी रात्री कुटुंबातील सर्वजण झोपी […]
आज दिवसाची सुरुवात काही चांगल्या बातमीने होणार !

आजचे राशिभविष्य दि.३ ऑगस्ट २०२५ मेष राशी आज कोणत्याही महत्त्वाच्या कामातील अडथळे दूर होऊ शकतात. यामुळे तुमचे मनोबल वाढेल. व्यवसाय क्षेत्रात गुंतलेल्या लोकांना त्यांच्या समस्यांवर शांततापूर्ण उपाय शोधावा लागेल. कोणाशीही अनावश्यक वाद घालू नका. वृषभ राशी आज व्यवसायिक कामानिमित्त झालेला प्रवास विशेषतः फायदेशीर ठरेल. व्यवसाय वाढवण्याच्या योजनांना चालना मिळेल. संघर्षानंतर महत्त्वाच्या कामांमध्ये यश मिळण्याची शक्यता […]