Home » जळगाव » धक्कादायक : शेडवरून पडल्याने एकाचा दुर्देवी मृत्यू !

धक्कादायक : शेडवरून पडल्याने एकाचा दुर्देवी मृत्यू !

रावेर : प्रतिनिधी

तालुक्यातील केऱ्हाळे बु, येथे पत्र्याच्या शेडवर काम करत असताना जमिनीवर पडून एका कामगाराचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना गुरुवारी सकाळी घडली. या घटनेत गंभीर अवस्थेत या कामगारास रावेर ग्रामीण रुग्णालयात तातडीने दाखल करण्यात आले; मात्र वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रद्युम्न महाजन यांनी त्यास दाखलपूर्व मृत घोषित केले. याप्रकरणी रावेर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, केऱ्हाळे बु, येथील एकता नगर परिसरात शिवम बाजीराव पाटील यांच्या घराच्या पत्र्याच्या शेडवर काम सुरू असताना विजय दत्तात्रय पाटील (वय ४५, रा. केन्हाळे बु, ता. रावेर) हे अचानक शेडवरून खाली पडले. या अपघातात ते गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने उपचारासाठी रावेर ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले; मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. ही घटना गुरुवार, दि. १९ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास घडली. याबाबत रवींद्र भिका पाटील यांनी दिलेल्या खबरीवरून रावेर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. रावेर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. या प्रकरणाचा पुढील हे.कॉ. योगेश महाजन करीत आहेत.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *