Home » ताज्या » व्यावसायिकाला ब्लॅकमेल केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल !

व्यावसायिकाला ब्लॅकमेल केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल !

पाचोरा : प्रतिनिधी

तालुक्यातील लोहारा येथील व्यावसायिक चंद्रकांत पाटील यांना रिव्हॉल्वर दाखवून धमकावून ब्लॅकमेल केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहिती नुसार, ३० ऑक्टोबर रोजी रात्री ८ च्या सुमारास चंद्रकांत पाटील यांना एका अनोळखी व्यक्तीकडून फोन आला. त्याने तुमची प्लॉटिंग साईट दाखवा, अशी मागणी केली. पाटील यांनी उद्या दाखवतो, असे सांगितल्यावर, समोरच्या व्यक्तीने आता रोडवरून तरी दाखवा, असा आग्रह धरला. यानंतर चंद्रकांत पाटील साईट दाखविण्यासाठी पाचोरा रोडवरील पेट्रोल पंपाजवळ गेले असता, तेथे आलेल्या व्यक्तीने त्यांना रिव्हॉल्वर दाखवून धमकावले. त्याने एका विवाहित महिलेला तिच्या नवऱ्यापासून वेगळं होण्यासाठी सांग, अन्यथा तुझा गेम करून टाकू, अशी धमकी दिली. संबंधित व्यक्तीने चंद्रकांत पाटील यांना ब्लॅकमेल केल्याने भीतीपोटी ऑनलाइन २ हजार रुपये पाठवले. पिंपळगाव (हरे) पोलिस ठाण्यात चेतन गोपाळ पाटील (अकलूद, ता. यावल) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *