“पार्थ पवार जमीन प्रकरणात मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतली दखल !

मुंबई : प्रतिनिधी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या कथित जमीन व्यवहार प्रकरणाने राज्याच्या राजकारणात चांगलीच खळबळ उडवली आहे. या प्रकरणाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर दखल घेतली असून, महसूल विभाग, आयजीआर आणि लँड रेकॉर्ड विभागाकडून सर्व कागदपत्रे आणि सविस्तर माहिती मागवली आहे. तसेच, प्राथमिक चौकशीचे आदेशही देण्यात आले आहेत. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले […]
अजित पवारांचा राजीनामा घेण्यासाठी लढू ; सुषमा अंधारेंची इशारा

पुणे : प्रतिनिधी पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरातील ४० एकर जमीन खरेदी प्रकरणामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. सरकारी नियम वाकवून आणि अल्प किमतीत ही जमीन ताब्यात घेण्याचा प्रयत्न झाल्याचा गंभीर आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. अंदाजे हजारो कोटी रुपयांच्या बाजारभावाची जमीन केवळ ३०० कोटींना विकत घेतली, असा दावा केला जात आहे. ही जमीन Amadea […]
१३३ ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना आश्वासित प्रगती योजनेचा लाभ मंजूर

मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांच्या सततच्या पाठपुराव्याला यश जळगाव : प्रतिनिधी जळगाव जिल्ह्यातील १३३ ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना अखेर दीड वर्षानंतर आश्वासित प्रगती योजनेचा लाभ मंजूर झाला असून, जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाने अत्यंत किचकट आणि तांत्रिक प्रक्रियेवर मात करून हे काम यशस्वीरीत्या पूर्ण केले आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे आणि प्रभावी समन्वयामुळे […]
मनोज जरांगे पाटील यांना जीवे मारण्याचा कट उघड : अडीच कोटींची सुपारी, दोन जण पोलिसांच्या ताब्यात

जालना : प्रतिनिधी मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांना जीवे मारण्याचा अडीच कोटी रुपयांचा कट रचल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी जालना पोलिस अधीक्षकांना जरांगे पाटलांचे सहकारी गंगाधर काळकुटे यांनी दिलेल्या तक्रारीनंतर स्थानिक गुन्हे शाखेने तत्पर कारवाई करत बीड जिल्ह्यातून दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे. ताब्यात घेतलेले संशयित म्हणजे दादा गरुड […]
फलटण आंदोलनानंतर सुषमा अंधारे यांचा दावा : तीनही मागण्यांना यश, तरीही एसआयटीवरच प्रश्नचिन्ह!

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणानंतर विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर चांगलाच निशाणा साधला होता. शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी फलटण पोलिस ठाण्याच्या बाहेर जाऊन ठिय्या आंदोलन केले होते. तसेच यावेळी त्यांनी अनेक पुरावे दाखवत रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यावर गंभीर आरोप केले होते. तसेच आता त्यांनी केलेल्या तीन मागण्यांना यश आल्याचे त्यांनी सोशल […]
भरधाव रेल्वेच्या जबर धडकेत ज्येष्ठाचा दुर्देवी मृत्यू

जळगाव : प्रतिनिधी शहरात बुधवार, ५ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास आसोदा उड्डाणपुलाच्या खालील रेल्वे मार्गालगत रेल्वेची धडक लागून एका ५७वर्षीय ज्येष्ठाचा मृत्यू झाला. अपघातानंतर नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली होती, मात्र सुरुवातीला मृतदेहाची ओळख पटू शकली नाही. दुपारच्या वेळी आसोदा उड्डाणपुलाजवळून जाणाऱ्या रेल्वे रुळावर हा अपघात झाला. रेल्वेची धडक लागल्याने संबंधित व्यक्तीचा जागीच मृत्यू […]
“जळगावात चेन नव्हे, अंगठ्या गायब : एका महिलेने तीन दुकानांतून ४.७० लाखांचे सोनं लंपास” !

जळगाव : प्रतिनिधी एका महिलेने हातचलाखीने शहरातील तीन नामांकित ज्वेलर्सच्या दुकानांतून एकाच दिवशी ४ लाख ७० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी शनिपेठ पोलिस ठाण्यात अज्ञात महिलेच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही चोरीच्या घटनांचे सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर एकाच अनोळखी महिलेने ही चोरी केल्याचे निष्पन्न झाले […]
जळगावात चेन स्नॅचिंगची धक्कादायक घटना : ५४ वर्षीय महिलेकडून सोन्याचे दागिने लांबवले !

जळगाव : प्रतिनिधी जळगाव शहरात गेल्या काही दिवसांपासून चेन स्नॅचिंगच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली असून, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. अशाच एका घटनेत शहरातील शिवशक्ती नगर परिसरात सोमवारी (३ नोव्हेंबर) रात्री दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात चोरट्यांनी ५४ वर्षीय महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावून नेले. मिळालेल्या माहितीनुसार, उषाबाई देविदास बोरसे (वय ५४, रा. शिवशक्ती […]
व्यावसायिकाला ब्लॅकमेल केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल !

पाचोरा : प्रतिनिधी तालुक्यातील लोहारा येथील व्यावसायिक चंद्रकांत पाटील यांना रिव्हॉल्वर दाखवून धमकावून ब्लॅकमेल केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहिती नुसार, ३० ऑक्टोबर रोजी रात्री ८ च्या सुमारास चंद्रकांत पाटील यांना एका अनोळखी व्यक्तीकडून फोन आला. त्याने तुमची प्लॉटिंग साईट दाखवा, अशी मागणी केली. पाटील यांनी उद्या दाखवतो, असे सांगितल्यावर, समोरच्या व्यक्तीने […]
तुमच्या मनात एखादी योजना असेल तर त्यावर आजच कृती करा आणि ते काम पूर्ण होणार !

आजचे राशिभविष्य दि.६ नोव्हेंबर २०२५ मेष राशी आज तुमची अडकलेली बहुतांश काम पूर्ण होऊ शकतात. तुम्ही मित्रांसोबत बाहेर जाण्याची योजना आखू शकता. आज तुमची आर्थिक परिस्थिती मजबूत असेल. कोणताही मोठा निर्णय घेण्यापूर्वी, तुमच्या वडिलांचा सल्ला घ्या. वृषभ राशी आज तुमची प्रलंबित कामे सहजपणे पूर्ण होतील. राजकारणात सहभागी असलेल्या या राशीच्या लोकांना एखाद्या प्रमुख पक्षात इच्छित […]