मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील काही ओबीसी नेत्यांनी मोर्चा काढला म्हणून जर सरकारने आमचे आरक्षण रद्द करण्याचा विचार केला तर सरकारला सोडणार नाही, मग सांगतोच सरकारला असे म्हणत मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला इशारा दिला आहे. तर आरक्षण रद्द करणाऱ्यांनाही आम्ही काय आहोत हे दाखवून देऊ असा इशारा जरांगे यांनी दिला आहे. जर तुम्हाला जर वाटत आहे की तुमचे आरक्षण कमी होत आहे तर अनेक जाती ओबीसींमध्ये टाकल्या तेव्हा का बोलले नाही? तुम्हाला ते चालतात आम्ही चालत नाही? असे जरांगे यांनी म्हटले आहे.
मनोज जरांगे म्हणाले की, नागपूरमध्ये जो ओबीसी समाजाचा मोर्चा निघाला आहे तो ट्रेलर आणि पिक्चर नसून काँग्रेसच्या लोकांना राहुल गांधी यांनी सांगितल्याप्रमाणे ते वागत आहेत. विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष आमच्याविरोधात हे एक मोठे षड्यंत्र आहे, असे मनोज जरांगे यांनी म्हटले आहे.
मनोज जरांगे पाटील म्हणाले की, नागपूरच्या मोर्चाला अनिल देशमुख उपस्थित राहणार असल्याचे समजले, त्यांना अचानक काय झाले काय समजले नाही. आम्ही स्वत:हून कुणावर बोलत नाही. पण अशा लोकांमुळे नेत्यांवर बोलण्याची वेळ येते त्याला असे लोक कारणीभूत असतात. आम्ही तुमच्या अगोदर 100 वर्षे ओबीसी आरक्षणात आहोत. त्यामुळे आम्ही आरक्षण सोडणार नाही.
मनोज जरांगे म्हणाले की, कितीही मोर्चे काढा काहीही करा आम्ही आरक्षण सोडणार नाही. काहीच रद्द होत नाही. तुम्हाला (बोगस) खोटं आरक्षण दिले आहे पण आमचे पोटं कधीच दुखले नाही, कारण आम्ही जळावू वृत्तीचे जळके नाही तुमच्यासारखे, असा टोला त्यांनी ओबीसी नेत्यांना लगावला आहे.
