September 20, 2026 9:14 pm

…तर सरकारला सोडणार नाही ; जरांगे पाटलांचा इशारा !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील काही ओबीसी नेत्यांनी मोर्चा काढला म्हणून जर सरकारने आमचे आरक्षण रद्द करण्याचा विचार केला तर सरकारला सोडणार नाही, मग सांगतोच सरकारला असे म्हणत मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला इशारा दिला आहे. तर आरक्षण रद्द करणाऱ्यांनाही आम्ही काय आहोत हे दाखवून देऊ असा इशारा जरांगे यांनी दिला आहे. जर तुम्हाला […]

उपमुख्यमंत्री शिंदेंना प्रसिद्धीचे वेड ; उद्धव ठाकरेंची टीका !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकारमधील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना प्रसिद्धीचे वेड लागल्याची टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी केली. ब्रिटनचे पंतप्रधान नुकतेच मुंबईच्या दौऱ्यावर आले होते. त्यांच्या स्वागतासाठी आपल्या उपमुख्यमंत्र्यांनी जागोजागी बॅनर लावलेत. अरे तिथपर्यंत पोहोचलास तरी का? बोललास तरी का? त्यांचे बॅनर पाहिले की, ब्रिटनच्या पंतप्रधानांनी शिंदे सेनेत […]

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर सरकारमधील मंत्र्यांचे धक्कादायक विधान !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले असताना आता यावर अजित पवार गटाचे मंत्री बाबासाहेब पाटील यांनी एक वादग्रस्त विधान केल्याने राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा वादंग सुरु होण्याचे चिन्ह आहे. लोकांना कर्जमाफीचा नाद लागलाय. आम्हाला निवडून यायचं असतं, त्यामुळे आम्ही निवडणुकीत काहीतरी अश्वासन देत असतो. पण लोकांनी ठरवायला पाहिजे की नेमकं काय […]

राष्ट्रवादी आमदाराच्या चारचाकीवर दगडफेक !

कोल्हापूर : वृत्तसंस्था राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दौऱ्यावर असताना मिरज तालुक्यातील चाबुकस्वार वाडी जवळ ही घटना घडली. गुरुवारी सायंकाळी आमदार नायकवडी मिरज पूर्व भागातील जानराववाडी येथे जात असताना लिमये मळा परिसरात त्यांच्या मोटारीवर अज्ञातांनी दगड भिरकावले. या दगडफेकीत मोटारीच्या मागील काचेचे मोठे नुकसान झाले, अशी माहिती त्यांचे पुत्र व माजी नगरसेवक अतहर नायकवडी […]

रावेर पोलिसांची मोठी कारवाई : १७ लाखांचा गांजा केला जप्त !

जळगाव : प्रतिनिधी दोन एकरावर तूरीच्या पिकात गांजाची लागवड करणाऱ्यांचा रावेर पोलिसांनी पर्दाफाश केला. ही कारवाई रावेर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने रावरे तालुक्यातील मोरव्हेल शिवारात केली. याठिकाणाहून सुमार १७ लाख रुपये किंमतीचे १७१ किलो वजनाची गांजाची (कॅनबिस वनस्पती) लागवड उद्ध्वस्त केली आहे. या प्रकरणी एका संशयितावर आरोपीवर एन.डी.पी.एस. अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. […]

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई : वरणगावात दोन गावठी पिस्तुल व जिवंत काडतूससह एक अटकेत !

जळगाव : प्रतिनिधी भुसावळ तालुक्यातील वरणगाव शहरात बेकायदेशीररित्या शस्त्र बाळगणाऱ्या एका रेकॉर्डवरील आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रंगेहाथ अटक केली आहे. कारवाई दरम्यान पोलिसांनी दोन गावठी पिस्तुल व एक जिवंत काडतूस असा सुमारे ५०,५०० रुपये किंमतीचा शस्त्रसाठा जप्त केला आहे. ही कारवाई ८ ऑक्टोबर रोजी रात्री ११.३० वाजता वरणगाव येथील तिरंगा चौकात करण्यात आली. अटकेतील […]

दारूच्या दुकानाजवळ तरुणाचा मृत्यू : नागरिकांनी दुकानाची केली जाळपोळ !

धरणगाव : प्रतिनिधी तालुक्यातील चोरगाव येथील एका तरुणाचा दारूच्या दुकानाजवळच मृत्यू झाल्याची घटना घडली. या वेळी पोलीस तेथे मृतदेह उत्तरीय तपासणीकरिता नेण्यासाठी गेले असता तेथील नागरिकांनी गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत मृतदेह उचलण्यास मज्जाव केल्याची घटना घडली.  सविस्तर वृत्त असे कि, येथून जवळच असलेल्या चोरगाव येथील कांतीलाल अशोक सोनवणे (वय ३५) या तरुणाचा दि.९ ऑक्टोबर […]

रस्त्यावर उभ्या चारचाकीला भीषण आग !

भुसावळ : प्रतिनिधी शहराजवळील दीपनगर औष्णिक वीज केंद्र परिसरातील सरगम गेट रोडवर बुधवारी (दि. ८) संध्याकाळी एलपीजी गॅस चालत्या चारचाकी गाडीला अचानक आग लागली. घटना घडल्यावर अग्निशमन दलाने तत्काळ आग नियंत्रणात आणली, आणि सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. अग्निशमन दलाने फोमचा वापर करून आग विझविण्याचे काम केले. कनिष्ठ अग्निशमन अधिकारी अमृतसिंग वसावे यांच्या मार्गदर्शनाखाली फायर […]

जिल्ह्यात खळबळ : मंत्र्यांचाचा पेट्रोल पंप दरोडेखोरांनी लुटला ; लाखोंची रोकड लंपास !

मुक्ताईनगर : वृत्तसंस्था केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या मालकीच्या रक्षा ऑटो फुएल्स या मुक्ताईनगरातील पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्यात आला. यात दोन कर्मचाऱ्यांना बंदुकीचा धाक दाखवत मारहाण करीत तोडफोड करण्यात आली. जवळपास एक लाख रुपयांची रोकड लंपास करण्यात आली. ही थरारक घटना राष्ट्रीय महामार्गावर गुरुवारी रात्री १०:४५ वाजेच्या सुमारास घडली. प्रकाश माळी व दीपक खोसे अशी […]

तुम्हाला अशा व्यक्तीची भेट होणार जी भविष्यात तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते.

आजचे राशिभविष्य दि. १० ऑक्टोबर २०२५ मेष राशी आज तुम्ही ऑफिसमध्ये फोनचा वापर कमीत कमी कराल आणि पूर्णपणे तुमच्या कामावर लक्ष केंद्रित कराल. आर्थिक बाबींमध्ये लोकांवर जास्त विश्वास ठेवणे टाळावे. कोणालाही पैसे उधार देण्यापूर्वी विचारपूर्वक विचार करणे शहाणपणाचे ठरेल. वृषभ राशी तुमच्या योजनांनुसार सर्वकाही चालत राहिल्याने, तुमचे मन तुमच्या कामावर केंद्रित राहील. सामाजिक कार्यात तुमची […]

error: Content is protected !!