जळगाव : प्रतिनिधी
दुचाकी व जीपच्या झालेल्या अपघात दुचाकीवरील गोजोरे (ता. भुसावळ) येथील रहिवासी महेंद्र शांताराम दोडे (वय ३७) व युवराज तुकाराम तायडे (वय ३२) दोघांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना २८ रोजी अडावदकडून चोपड्याकडे भिलटदेव येथे हे दोघे जाताना सकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली.
सविस्तर वृत्त असे कि, भिलटदेव बाबाच्या दर्शनासाठी मोटारसायकलने (एमएच १९ बी.जे. ८६०२) ने हे दोघे जात असताना समोरुन येणाऱ्या जीपशी (एमएच १९ सीएक्स १४९०) धडक झाली. जीपचालक मनोज संजय पाटील (२४, रा. वेले, ता. चोपडा) यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी अडावद पोलिस ठाण्यात उशिरापर्यंत गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.
