सकाळपासून राज्यातील १२ ठिकाणी ईडीची छापेमारी !

पुणे : वृत्तसंस्था राज्यातील मुंबई पुण्यासह नाशिक आणि वसई-विरारमध्ये 12 ठिकाणी छापेमारी करण्यात आली आहे. वसई-विरार महानगरपालिकेचे माजी आयुक्त अनिल कुमार पवार यांच्याही वसई येथील दीनदयाल नगरमधील निवासस्थानी आज सकाळी ईडीने छापेमारी केली आहे. कालच त्यांनी वसई-विरार महापालिकेतील आयुक्त पदाचा कारभार मनोज कुमार सूर्यवंशी यांच्या हाती सुपूर्द केला होता. आता दुसऱ्याच दिवशी अनिलकुमार पवार यांच्या […]
राज्य मंत्रिमंडळ निर्णय: पंचायतींसाठी पुरस्कार, महिलांसाठी ‘उमेद मॉल’, न्यायालये व सिंचन प्रकल्पांना मंजुरी

मुंबई : प्रतिनिधी राज्य सरकारने झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत विविध महत्त्वपूर्ण निर्णयांना मंजुरी दिली आहे. ग्रामपंचायतींच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी प्रोत्साहनपर पुरस्कार, ग्रामीण महिलांच्या उत्पादनांसाठी ‘उमेद मॉल’ची उभारणी, महिलांवरील अत्याचारांवरील खटल्यांसाठी विशेष न्यायालये, तसेच वर्धा जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांच्या दुरुस्तीसाठी कोट्यवधींच्या निधीची मंजुरी देण्यात आली आहे. याशिवाय, ‘ई-नाम’ योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कृषी उत्पन्न बाजार समिती कायद्यात बदल आणि वकिलांसाठी […]
आईसह अल्पवयीन मुलीचा केला तरुणाने विनयभंग !

जळगाव : प्रतिनिधी तालुक्यातील एका गावामधील १२ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग करण्यासह त्याचा जाब विचारणाऱ्या आईचाही तरुणाने विनयभंग केल्याची घटना दिनांक २७ जुलै रोजी घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येऊन त्याला अटक करण्यात आली आहे. भूषण सोपान पाटील (रा. शिरसोली प्र.न. ता. जळगाव) याच्याविरुद्ध तक्रार दाखल झाली आहे. सविस्तर वृत्त असे कि, […]
सुळेंचा गंभीर आरोप : लाडक्या बहिणी योजनेत मोठा घोटाळा !

मुंबई : वृत्तसंस्था लाडकी बहीण योजनेत 4800 कोटींचा घोटाळा झाल्याचा बॉम्बगोळा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी टाकला. त्यांच्या आरोपांनी एकच खळबळ उडाली आहे. थेट लाभार्थ्यांच्या खात्यात रक्कमेचे हस्तांतरण प्रक्रियेतील पारदर्शकतेवरच त्यांनी सवाल उभा केला. इतक्या चाळण्या असताना पुरूष लाभार्थी या योजनेत घुसलेच कसे असा थेट सवाल त्यांनी विचारला. राज्य सरकारने या […]
अँटी चेंबरमध्ये अजित पवारांनी काढली कोकाटे यांची खरडपट्टी !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकारमधील अजित पवार गटाचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे हे शेतकऱ्यांविषयी वादग्रस्त वक्तव्यांचा सपाटा आणि विधानपरिषदेत अधिवेशनकाळात ऑनलाईन रमी खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने टीकेच्या भोवऱ्यात सापडलेले असून आता राजीनामा घेतला जाणार की नाही, याचा लवकरच फैसला होणार आहे. आज राज्यमंत्रिमंडळाची बैठक झाली. त्यापूर्वी माणिकराव कोकाटे आपल्या मुलीसह मंत्रालयात आले होते. त्यांनी अजित […]
“योगेश, तू चिंता करू नको, ; शिंदे – फडणवीस आमने सामने !

मुंबई : वृत्तसंस्था राज्याच्या पावसाळी अधिवेशनात गृह राज्यमंत्री योगेश कदम यांच्यावर वाळू चोरी आणि डान्स बार प्रकरणात गंभीर आरोप झाले होते. त्यानंतर अनिल परब आणि सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी कदम यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली होती. दरम्यान, अनिल परब यांच्या आरोपानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तथ्य असल्यास चौकशी करू असं उत्तर दिल आहे. दुसरीकडे […]
खळबळजनक : बसची ट्रकला भीषण धडक ; १८ कावड यात्रेकरुंचा मृत्यू

नवी दिल्ली : वृत्तसंस्था झारखंडमधील देवघरमध्ये मंगळवारी सकाळी भीषण अपघात झाला. यात १८ कावड यात्रेकरुंचा मृत्यू झाला आहे. तर अनेकजण जखमी झाले आहेत. मोहनपूर पोलिस स्थानकाच्या हद्दीतील जमुनिया जंगलाजवळ पहाटे ४.३० च्या सुमारास हा अपघात झाल्याचे पोलिसांनी सांगितले. बाबा नगरी देवघर येथील बाबा वैजनाथ धाम येथे जलाभिषेक केल्यानंतर कावड यात्रेकरुंची बस दुमका येथील बासुकीनाथ मंदिराच्या […]
पारोळा पोलिसांची कामगिरी : दुचाकी चोरणारे दोघे चोरटे अटकेत !

पारोळा : प्रतिनिधी तालुक्यातील कोळपिंप्री येथील दुचाकी चोरीचा गुन्हा पारोळा पोलिसांनी उघडकीस आणला असून यातील दोघांनाही पोलिसांनी अटक केली आहे. अभय प्रवीण पाटील (१९, कोळपिंप्री, ता. पारोळा), मयूर तुळशीदास देवरे (२२, खडकी, ता. मालेगाव) अशी या दोघा चोरट्यांची नावे आहेत. सविस्तर वृत्त असे कि, दि. २१ जुलै रोजी रात्री ११ वाजेनंतर ज्ञानेश्वर मच्छिंद्र कोळी (कोळपिंप्री) […]
अडावदकडून चोपड्याकडे जातांना दुचाकीचा भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू !

जळगाव : प्रतिनिधी दुचाकी व जीपच्या झालेल्या अपघात दुचाकीवरील गोजोरे (ता. भुसावळ) येथील रहिवासी महेंद्र शांताराम दोडे (वय ३७) व युवराज तुकाराम तायडे (वय ३२) दोघांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना २८ रोजी अडावदकडून चोपड्याकडे भिलटदेव येथे हे दोघे जाताना सकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली. सविस्तर वृत्त असे कि, भिलटदेव बाबाच्या दर्शनासाठी मोटारसायकलने (एमएच १९ […]
सत्तेत असलेल्या उच्चपदस्थ लोकांच्या जवळीकतेचा तुम्हाला फायदा होणार !

आजचे राशिभविष्य दि.२९ जुलै २०२५ मेष राशी आज कामाच्या ठिकाणी तुमच्या सहकाऱ्याशी भांडण होऊ शकते. तुमच्या बोलण्यावर आणि रागावर नियंत्रण ठेवा. अन्यथा जुने संबंध बिघडू शकतात. सत्तेत असलेल्या उच्चपदस्थ लोकांच्या जवळीकतेचा तुम्हाला फायदा होईल. शेतीत तुम्हाला कठोर परिश्रम करावे लागतील. वृषभ राशी आज, नवीन व्यवसाय किंवा उद्योग सुरू करण्याची योजना मित्राच्या मदतीने यशस्वी होईल. लहान […]