Home » जळगाव » अमळनेर » कुंटणखाना चालविणाऱ्या दोन महिलांना पोलीस कोठडी !

कुंटणखाना चालविणाऱ्या दोन महिलांना पोलीस कोठडी !

अमळनेर : प्रतिनिधी

इतर महिलांकडून देहविक्री व्यवसाय करून घेणाऱ्या दोन मालकीनींना न्यायालयाने २ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. तर पीडित ९ महिलांची जळगाव येथील आशादीप महिला सुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे.

पो.नि. दत्तात्रय निकम यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांच्या पथकाने गांधलीपुरा भागात देहविक्री व्यवसाय व्यवसाय करून घेणाऱ्या शशिकला मदन बडगुजर (वय ५०) व मीना दीपक मिस्तरी (वय ६०) या दोन मालकिणींना तसेच त्यांच्याकडे देहविक्री करणाऱ्या महिलांना अटक केली होती. तसेच त्या ठिकाणी असलेल्या ९ ग्राहकांना ही पोलिसांनी ताब्यात घेतले होते. या ९ ग्राहकांवर कलम ११२, ११७ प्रमाणे कारवाई करून त्यांना त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले होते. तर मालकिणी आणि पीडित महिलांना पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता दोन्ही मालकिणनिा न्या. यलमाने यांनी २ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. तर पीडित महिलांना जळगाव येथील आशादीप महिला बाल सुधारगृहात रवाना केले आहे.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *