जळगाव : प्रतिनिधी
हॉटेलमधून जेवण करून निघाल्यानंतर सैय्यद जावेद सैय्यद अजीज (३९, रा.शाहूनगर) यांच्या डोळ्यात मिरची पूड टाकून त्यांच्यावर धारदार शस्त्राने वार करण्यात आले. यात त्यांना जबर दुखापत झाली. ही घटना २७ऑक्टोबर रोजी रात्री हॉटेल साई पॅलेससमोर घडली. या प्रकरणी २८ ऑक्टोबर रोजी अनोळखी दोन जणांविरुद्ध तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सैय्यद जावेद सैय्यद अजीज हे मित्रांसोबत खोटेनगरजवळील हॉटेलवर जेवणासाठी गेले होते. जेवणानंतर दोघे जण बाहेर आले. त्यावेळी एका दुचाकीवर आलेल्या अनोळखी दोघांनी सैय्यद जावेद यांच्या डोळ्यात मिरचीची पूड फेकली आणि धारदार शस्त्राने वार करून गंभीर दुखापत केली. त्यानंतर, हल्लेखोर पसार झाले. जखमी सैय्यद यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात दाखल करण्यात आले.



