ठाण्यात 21 वर्षीय तरुणाचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. मृत व्यक्तीस गंभीर स्वरूपाचा मधुमेह होता आणि त्याला 22 मे रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 23 मे रोजी रात्री त्याचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आणि त्यानंतर काही तासांतच त्याचा मृत्यू झाला.
राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागानं दिलेल्या माहितीनुसार, सध्या महाराष्ट्रात 166 सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. 24 मे रोजी एकूण 47 नवीन रुग्ण पॉझिटिव्ह आढळले असून, यामध्ये ठाण्यातील 10 रुग्णांचा समावेश आहे.

JN.1 हा सध्या आढळणारा व्हेरियंट ओमिक्रॉनचा उपप्रकार असून, तो फारसा घातक नाही, अशी माहिती डॉ. संजय राय यांनी दिली आहे. ते म्हणाले, “JN.1 विषाणू सर्दी-खोकल्यासारखा सौम्य लक्षणांसह आढळतो. घाबरण्याची गरज नाही.”
मुंबईत रुग्णवाढ झाल्यानंतर ठाण्यातही रुग्ण संख्या वाढत असल्याने आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडमध्ये आहे. ठाणे सिव्हिल रुग्णालयात 40 खाटांचे विशेष कोरोना कक्ष तयार करण्यात आले असून, आवश्यक वैद्यकीय सुविधा पुरवण्यात आल्या आहेत.
राज्य सरकारने नागरिकांना सावध राहण्याचं आणि लक्षणे आढळल्यास तात्काळ तपासणी करून उपचार घेण्याचं आवाहन केलं आहे.
Author: K P Chavan
thepubliclive



