जळगाव : प्रतिनिधी .शहरातील माजी नगरसेवक अनंत हरिश्चंद्र जोशी(बंटी) यांनी आज दि.१ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारच्या सुमारास राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकिस आली असून त्यांच्या आत्महत्येच्या कारणाचा अद्याप शोध लागला नसला तरी पुढील तपास चालू आहे. दरम्यान जिल्हा सामान्य रुग्णालयात बंटी जोशी यांच्या समर्थकांनी प्रचंड गर्दी केली होती.
सविस्तर वृत्त असे कि, जळगाव शहर मनपातील माजी नगरसेवक अनंत हरिश्चंद्र उर्फ बंटी जोशी (वय-४८ ) यांनी शुक्रवार दि. १ ऑगस्ट रोजी आपल्या जयनगर परिसरातील राहत्या घरी दुपारी १ ते ३ वाजेच्या सुमारास वरच्या मजल्यावर गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. सायंकाळी ७.३० च्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. नातेवाईकांनी बंटी जोशी यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. माजी नगरसेवक अनंत जोशी हे ‘बंटी जोशी’ या नावाने जळगाव मध्ये प्रसिद्ध व्यक्तिमत्व होते. अनंत उर्फ बंटी जोशी हे जळगाव मनपातील अभ्यासू नगरसेवक असून ते सलग दोन वेळा महापालिकेच्या निवडणुकीत प्रभाग १२ मधून ते निवडून आले होते. अभ्यासू , हसतमुख आणि मनमिळावू स्वभावामुळे शहरात त्यांची विशेष ओळख होती. त्यांच्या निधनाची बातमी समजताच नातेवाईकांसह अनेक समाजसेवक आणि मित्रांनी रुग्णालयात गर्दी केली. यात माजी महापौर नितीन लढा, विष्णु भंगाळे, सुनील महाजन यांच्यासह शहरातील व महापालिका क्षेत्रातील राजकीय क्षेत्रातील मित्र परिवाराने त्यांच्या घरी गर्दी

Author: K P Chavan
thepubliclive



