September 24, 2026 11:35 am

लाईव्ह न्यूज :
लाईव्ह न्यूज :

ब्रेकिंग न्युज; हसतमुख नगरसेवकाचा अचानक निरोप – आत्महत्येने शहरात शोककळा 

जळगाव : प्रतिनिधी .शहरातील माजी नगरसेवक अनंत हरिश्चंद्र जोशी(बंटी) यांनी आज दि.१ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारच्या सुमारास राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकिस आली असून त्यांच्या आत्महत्येच्या कारणाचा अद्याप शोध लागला नसला तरी पुढील तपास चालू आहे. दरम्यान जिल्हा सामान्य रुग्णालयात बंटी जोशी यांच्या समर्थकांनी प्रचंड गर्दी केली होती. सविस्तर वृत्त असे […]

सरकारची प्रतिमा कलंकित; मंत्र्यांना जावेच लागेल – संजय राऊत

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील मंत्रिमंडळातील वादग्रस्त मंत्र्यांवर कारवाई करण्यास सरकार कमी पडत असल्याचा आरोप करत खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. “सरकार मंत्र्यांना वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहे. कितीही रंगसफेदी केली तरी सरकारची प्रतिमा कलंकित झाली आहे. महाराष्ट्राच्या भाळी डाग लागला असून तो अशा तात्पुरत्या निर्णयांनी पुसला जाणार नाही. शेवटी […]

व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत तरुणीवर अत्याचार !

जळगाव : प्रतिनिधी क्लासला सोडण्याकरीता वाहनावरील चालकाने तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्यानंतर तरुणीला फोटो आणि व्हीडीओ व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर तरुणीला पळवून नेत लग्न करीत तिचेआक्षेपार्ह फोटो काढून ते सोशल मीडियावर अपलोड करीत बदनामी केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी संशयित गणेश साहेबराव पाटील (रा. रामेश्वर कॉलनी) या तरुणासह त्याला मदत […]

एस.टी.बस नाल्यात पलटी; एक ठार तर अनेक जखमी !

एरंडोल : प्रतिनिधी एरंडोल-कासोदा मार्गावर शुक्रवारी सकाळी भीषण अपघात घडला. एरंडोल-भडगाव मार्गावर धावणारी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची (MH २० BL ३४०२) एस.टी. बस अचानक अनियंत्रित होऊन रस्त्यालगतच्या नाल्यात कोसळली. या दुर्दैवी घटनेत एका प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला असून, १५ जण गंभीर जखमी झाले आहेत. तर, ३५ हून अधिक प्रवाशांना किरकोळ दुखापती झाल्या आहेत. अपघातानंतर परिसरात […]

रम्मीमुळे कोकाटे बाहेर; दादांचे शिलेदार कृषी मंत्री

मुंबई : वृत्तसंस्था गेल्या काही महिन्यापासून विधान भवनात रम्मीचा ऑनलाइन डाव खेळताना दिसलेले कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना अखेर त्यांच्या कृतीची मोठी किंमत मोजावी लागली आहे. पावसाळी अधिवेशनादरम्यान त्यांचा हा ‘खेळ’ चांगलाच चर्चेत आला होता. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) नेते रोहित पवार यांनी कोकाटे यांचा रम्मी खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल केल्यानंतर विरोधकांनी त्यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले. […]

दोन गुन्हेगार तडीपार; उपविभागीय अधिकाऱ्यांचा निर्णायक आदेश

भुसावळ : प्रतिनिधी भुसावळ शहर व परिसरातील गंभीर गुन्ह्यांमध्ये सक्रिय असलेल्या दोन सराईत गुन्हेगारांवर तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे. संबंधित पोलीस ठाण्यांकडून मिळालेल्या प्रस्तावावर उपविभागीय अधिकारी शुभम पाटील यांनी कारवाईला मंजुरी दिली आहे. प्राप्त माहितीनुसार, शुभम प्रभाकर चौधरी (वय २४, रा. जयश्री नगर, भुसावळ) आणि गिरीश गोविंद चोरे (वय २३, रा. चोरे नगर) हे दोघेही […]

चाळीसगावात लाचखोरीचा पर्दाफाश; तलाठीसह तिघांना २५ हजारांची लाच घेताना अटक

चाळीसगाव : प्रतिनिधी वडिलोपार्जित शेतजमिनीवरील कालबाह्य नोंद कमी करण्याच्या कामासाठी २५ हजारांची लाच स्विकरणाऱ्या चाळीसगाव तलाठी मोमीन दिलशाद अब्दुल रहीम (वय २९) यांच्यासह रोजगार सेवक वडीलाल रोहीदास पवार (वय ४०) व दादा बाबू जाधव (वय ४०) या तिघांना रंगेहाथ पकडले. ही कारवाई धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली. तक्रारदाराने त्यांच्या वडिलांच्या नावावर असलेल्या मौजे पाथरजे, ता. […]

पत्नीला मोबाईलवरून संदेश पाठविला अन तरुणाने संपविले आयुष्य !

रावेर : प्रतिनिधी निंभोरा बु.येथील वाघोदा रस्त्यावरील मुकेश उर्फ विजय रमेश भंगाळे (वय ३५) या तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. दि.३१ जुलै रोजी सकाळी १० वाजेच्या आधी मुकेश उर्फ विजय याने आपल्या पत्नीला मोबाईलवर मी आत्महत्या करीत असल्याचा मेसेज टाकून त्यांच्या राहत्या घराजवळच्या जुन्या खोलीमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. यावेळी निंभोरा पोलिसांनी याबाबत […]

२९ वर्षीय तरुणाचा कुजलेल्या अवस्थेत सापडला मृतदेह !

जळगाव : प्रतिनिधी चप्पल घेण्यासाठी जातो सांगून घरातून बाहेर पडलेल्या रामू हशा वास्कले (वय २९, रा. नांदिया, ता. भगवानपूर, जि. खरगौन, मध्यप्रदेश, ह. मु. कुसुंबा, ता. जळगाव) या तरुणाचा पाच दिवसानंतर मृतदेह कुजलेल्या अवस्थे मिळून आला. ही घटना गुरुवारी सकाळी साडनऊ वाजता विमानतळाच्या मागील बाजूस शेताच्या बांधावर घडली. मृतदेह कुजलेल्या अवस्थेत मिळून आल्याने पोलिसांकडून सर्व […]

धक्कादायक : चारचाकीने धडक दिल्यानंतर युवकास मारहाण; तिघांविरुध्द गुन्हा

अमळनेर : प्रतिनिधी शहरातील तांबेपुरा भागात युवकाला चारचाकीने धडक देत नंतर लोखंडी रॉड व लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी तिघांविरुद्ध अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जखमी युवकावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सविस्तर वृत्त असे कि, तांबेपुरा येथील शिवशक्ती चौकात जयेश राजेंद्र पाटील (तांबेपुरा) हा ३० जुलै रोजी सकाळी […]

error: Content is protected !!