Home » राष्ट्रीय » ब्रेकिंग न्यूज : राजधानी हादरली! लाल किल्ल्याजवळ भीषण स्फोट – १० ठार, अनेक जखमी; मुंबईत हाय अलर्ट!

ब्रेकिंग न्यूज : राजधानी हादरली! लाल किल्ल्याजवळ भीषण स्फोट – १० ठार, अनेक जखमी; मुंबईत हाय अलर्ट!

नवी दिल्ली (पब्लिक लाईव्ह न्यूज)

देशाची राजधानी दिल्ली पुन्हा एकदा हादरली आहे. लाल किल्ल्याजवळील सब्बाष मार्ग परिसरात शनिवारी संध्याकाळी सुमारे ७ वाजताच्या सुमारास झालेल्या एका भीषण स्फोटात किमान १० जणांचा मृत्यू, तर २४ पेक्षा अधिक नागरिक जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.

प्राथमिक माहितीनुसार, लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ उभ्या असलेल्या एका वाहनात अचानक मोठा स्फोट झाला. या स्फोटानंतर वाहनाला आणि आजूबाजूला उभ्या असलेल्या काही गाड्यांना व ऑटोरिक्षांना आग लागली. त्यामुळे काही क्षणातच परिसर धुराने आणि ओरडांनी भरून गेला.

तपास सुरू

स्फोटानंतर दिल्ली पोलिस, अग्निशमन दल आणि एनएसजी चे पथक घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या सात गाड्यांनी आगीवर नियंत्रण मिळवलं आहे.

दिल्ली पोलिसांनी सांगितले की — “सध्या ही घटना बॉम्बस्फोट आहे असं निश्चित सांगता येत नाही. वाहनातील तांत्रिक बिघाडामुळेही हा स्फोट झाला असण्याची शक्यता आहे.”

केंद्रीय यंत्रणा सज्ज

गृह मंत्री अमित शहा यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली असून, “सर्व शक्यता तपासल्या जात आहेत, दोषींना वाचवले जाणार नाही” असे वक्तव्य केले आहे.

घटनास्थळी फॉरेन्सिक टीम, एनआयए व डॉग स्क्वॉड तातडीने दाखल झाले आहेत. परिसर सील करण्यात आला असून सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत.

देशभरात सुरक्षा कडक

या घटनेनंतर दिल्लीसह उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, बिहार आदी राज्यांमध्ये हाई अलर्ट घोषित करण्यात आला आहे. विशेषतः अयोध्या, काशी व मथुरा या धार्मिक स्थळांवर अतिरिक्त सुरक्षा तैनात करण्यात आली आहे

K P Chavan
Author: K P Chavan

thepubliclive

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *