जळगाव : प्रतिनिधी
तालुक्यातील आसोदा गावातील एका भागात राहणाऱ्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याची घटना मंगळवारी २९ एप्रिल रोजी पहाटे ४ वाजता समोर आली आहे. याप्रकरणी बुधवारी ३० एप्रिल रोजी मध्यरात्री १२.३० वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आसोदा गावात १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. मध्यरात्री घरातील सर्वजण झोपलेले असतांना अज्ञात व्यक्तीने पिडीत मुलीला काहीतरी आमीष दाखवत फूस लावून पळवून नेले. ही घटना मंगळवारी २९ एप्रिल रोजी पहाटे ४ वाजता समोर आली आहे. पिडीत मुलीच्या नातेवाईकांनी त्यांचा सर्वत्र शोध घेतला परंतू कोणतीही माहिती मिळाली नाही. अखेर तिच्या पालकांनी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



