पोटाची चरबी कमी करायची तुमच्यासाठी ‘हि’ बातमी महत्वाची !

जर तुम्हाला वाढत्या वजनाची किंवा पोटाच्या चरबीची काळजी वाटत असेल तर काळजी करू नका. काही दिवसांतच तुमचे पोट आकुंचन पावू शकते आणि तुमचा लठ्ठपणा नाहीसा होऊ शकतो. तुमचे पोट सपाट दिसू शकते आणि तुमची चरबी कमी होऊ शकते यासाठी कोणत्या पाच गोष्टी करायच्या आहेत याबद्दल आवाज आम्ही सांगणार आहोत…. रात्री जेवण केल्यानंतर, मी माझा मोबाईल […]
पोलिस प्रशासन अलर्ट मोडवर : साईसमाधी मंदिराला उडविण्याची धमकी !

अहिल्यानगर : वृत्तसंस्था देशातील जम्मू काश्मीर येथील पहलगाम अतिरेकी हल्ल्यामुळे अवघ्या देशात संतापाची लाट उसळली असताना आता शिर्डीचे साईसमाधी मंदिर बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. यासंबंधीचा एक ईमेल साई संस्थानला मिळाला आहे. या ईमेलमुळे पोलिस प्रशासन अलर्ट मोडवर आले आहे. गत 22 एप्रिल रोजी जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे अतिरेकी हल्ला झाला होता. त्यात […]
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयासाठी अत्याधुनिक थ्री टी एमआरआय कार्यान्वित

जळगावातील शासकीय आरोग्यसेवा झाली हायटेक; संपूर्ण सुविधा असलेले राज्यातील पहिले केंद्र– पालकमंत्री गुलाबराव पाटील मानवी अवयव प्रत्यारोपण वगळता सर्व शस्त्रक्रिया होणारे रुग्णालय; राज्यातील पहिले मेडिकल हब जळगावमध्ये– जलसंपदामंत्री गिरीश महाजन जळगाव, दि. ३ मे (जिमाका) – जळगावमधील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात विविध उपचारांसाठी जिल्हा वार्षिक नियोजनाच्या निधीतून अत्याधुनिक यंत्रसामग्री घेतली असून, आज अद्ययावत एमआरआय मशीनचे […]
महत्वाची बातमी : जळगाव जिल्ह्यात ३ मे ते १६ मे दरम्यान जमावबंदी लागू

जळगाव : प्रतिनिधी संभाव्य महानगरपालिका निवडणुका आणि येणारे सण लक्षात घेता जिल्ह्यातील सामाजिक आणि राजकीय वातावरण तापू शकते हे लक्षात घेवून , कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी यांचे आदेशान्वये अपर जिल्हादंडाधिकारी गजेंद्र पाटोळे यांनी मुंबई पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७(१) व (३) अंतर्गत हा आदेश जारी केला […]
भारताची मोठी कारवाई : वस्तूंवर घातली पूर्णपणे बंदी !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाल्यानंतर भारत पाकिस्तानवर कारवाई करीत असतांना आता पुन्हा एकदा भारताने मोठी कारवाई केली आहे. भारत सरकारने आता पाकिस्तानमधून येणाऱ्या वस्तूंवर पूर्ण बंदी घातली आहे. म्हणजेच आता कोणतीही वस्तू कोणत्याही प्रकारे पाकिस्तानमधून देशात येणार नाही. वाणिज्य मंत्रालयाने याविषयी माहिती देताना,”आता पाकिस्तानमधून आयात पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे.” असे […]
अजित पवारांना मुख्यमंत्री होण्याची इच्छा : भर कार्यक्रमात बोलून दाखविले !

पुणे : वृत्तसंस्था राज्यात महायुती सरकारमध्ये अजित पवार उपमुख्यमंत्री म्हणून काम पाहत असतांना आता त्यांची मुख्यमंत्री होण्याची इच्छा लपून राहिलेली नाही. अनेक वर्षांपासून त्यांनी आणि त्यांच्या समर्थकांनी ही भावना वेळोवेळी सूचित केली आहे. उपमुख्यमंत्रिपदावर त्यांनी तब्बल सहावेवेळा विराजमान होत ऐक्याचा विक्रम केला असला, तरी अजूनही त्यांच्या राजकीय कारकिर्दीत ‘मुख्यमंत्री’ हा शब्द जोडलेला नाही. अजित पवार […]
राज्यातील ‘या’ जिल्ह्यात ऑरेंज, येलो अलर्ट जारी

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील काही भागातील तापमानाचा पारा 40 अंश सेल्सिअसच्या पुढे गेला आहे. यातच आता उकाडयाने हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळणार आहे. महाराष्ट्रात पुढील तीन दिवसांमध्ये वादळी वाऱ्यांसह वीजांचा कडकडाट आणि मध्यम पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. राज्यातील भंडारा, चंद्रपूर, गोंदिया आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे. तर विदर्भातही […]
मध्यरात्री १७ वर्षीय मुलीचे घरातून अपहरण !

जळगाव : प्रतिनिधी तालुक्यातील आसोदा गावातील एका भागात राहणाऱ्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याची घटना मंगळवारी २९ एप्रिल रोजी पहाटे ४ वाजता समोर आली आहे. याप्रकरणी बुधवारी ३० एप्रिल रोजी मध्यरात्री १२.३० वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आसोदा गावात १७ […]
शिक्षकाच्या घरातून चोरट्यांनी कपाट लांबविले !

अमळनेर : प्रतिनिधी घराबाहेर झोपलेल्या शिक्षकाच्या घरातून चोरट्यांनी कपाटच लांबवले. यात २ लाख ७३ हजार रुपयांचा ऐवज होता. ही घटना ३० रोजी मध्यरात्री तालुक्यातील खवशी येथे घडली. मिळालेल्या माहितीनुसार, खवशी येथे शिक्षक सिद्धार्थ वसंत शिरसाठ बुधवारी रात्री घराबाहेर झोपलेले होते. रात्री तहान लागल्याने ते घरात जात होते. परंतु दरवाजा आतून बंद होता. मागे जाऊन पाहिले […]
आरोग्याच्या दृष्टीने आजचा दिवस चांगला राहील

आजचे राशीभविष्य दि.३ मे २०२५ मेष राशी नोकरी करणाऱ्यांना नफा आणि प्रगतीच्या संधी मिळतील. व्यवसाय क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना व्यवसायात नवीन उत्पन्नाच्या स्रोतांचा फायदा होण्याची शक्यता आहे. कोर्टकचेरीच्या बाबतीत सावधगिरी बाळगा. जास्त भावनिक होऊन कोणताही मोठा निर्णय घेऊ नका. वृषभ राशी तुमच्या धाडस आणि शौर्याबद्दल सरकारकडून तुम्हाला सन्मानित केले जाऊ शकते. ज्यामुळे तुम्हाला मान आणि […]