तुरुंगातील आरोपी वाल्मीक कराडची ऑडिओ क्लिप व्हायरल !
बीड : वृत्तसंस्था राज्यातील बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात तुरुंगात खडी फोडणाऱ्या वाल्मीक कराडची आणखी एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. त्यात तो पैसे मागणाऱ्या एका व्यक्तीला कोण रे तू कुत्रा? म्हणत जातीवाचक शिवीगाळ करताना ऐकू येत आहे. या क्लिपमुळे वाल्मीक कराडचा पाय आणखी खोलात जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे….