खळबळजनक : रेल्वेस्थानकावर उभ्या रेल्वे डब्याला भीषण आग !
हिंगोली : वृत्तसंस्था राज्यातील हिंगोली रेल्वेस्थानकावर उभ्या असलेल्या एका रेल्वे डब्याला आज (6 ऑगस्ट) सकाळी 8:30 वाजेच्या सुमारास भीषण आग लागली. या घटनेत एक डबा पूर्णपणे जळून खाक झाला. आगीचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून, रेल्वे प्रशासन आणि अग्निशमन दलाने आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. हिंगोली रेल्वेस्थानकावर गेल्या काही महिन्यांपासून तीन रेल्वे डबे उभे होते….