November 15, 2026 9:13 pm

लाईव्ह न्यूज :
जळगाव शहराच्या विकासाला १० कोटींचे बळ! राजूमामांच्या पाठपुराव्याने १९ प्रभागांना निधी; प्रवेशमार्गही उजळणार! जळगावच्या उद्योगांना आता विदर्भ-मराठवाड्याप्रमाणे प्रोत्साहने! ‘डी प्लस’ दर्जाची अंमलबजावणी; राजूमामांच्या पाठपुराव्याला यश जळगावातील लाचखोर अधिकारी सतीश शिसोदे यांच्या घरात ५.१६ कोटींचे घबाड! सोन्याचे बिस्कीट, प्लॅटिनम अन् दोन घरे उघड! जिल्हा बँक निवडणुकीत किशोर पाटील यांना धक्का! पुत्र सुमित पाटील यांचा उमेदवारी अर्ज बाद सातपुड्यातील ७,५०० एकर जंगलाची कत्तल? वनजमिनीवरील अतिक्रमणाचा गंभीर आरोप; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश! कारागृहात रचला ३५ कोटींच्या दरोड्याचा कट! बडतर्फ PSI मास्टरमाइंड; भोकर SBI बँकेतील चारही संशयित पोलिसांच्या ताब्यात

Home » राष्ट्रीय » खळबळजनक : रेल्वेस्थानकावर उभ्या रेल्वे डब्याला भीषण आग !

खळबळजनक : रेल्वेस्थानकावर उभ्या रेल्वे डब्याला भीषण आग !

हिंगोली : वृत्तसंस्था

राज्यातील हिंगोली रेल्वेस्थानकावर उभ्या असलेल्या एका रेल्वे डब्याला आज (6 ऑगस्ट) सकाळी 8:30 वाजेच्या सुमारास भीषण आग लागली. या घटनेत एक डबा पूर्णपणे जळून खाक झाला. आगीचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून, रेल्वे प्रशासन आणि अग्निशमन दलाने आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले.

हिंगोली रेल्वेस्थानकावर गेल्या काही महिन्यांपासून तीन रेल्वे डबे उभे होते. यापैकी एका डब्याला बुधवारी सकाळी अचानक आग लागली. डब्यातून आगीचे लोळ आणि धुराचे लोट बाहेर पडत असल्याचे रेल्वे कर्मचाऱ्यांच्या लक्षात येताच त्यांनी तातडीने आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र, आग भडकत असल्याने स्थानिक नगर परिषदेच्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले.

काही मिनिटांत अग्निशमन दलाचा एक बंब घटनास्थळी दाखल झाला. मात्र, बंबातील पाणी संपले तरी आग आटोक्यात येत नव्हती. त्यामुळे दुसरा बंब मागवण्यात आला. सुमारे एक तासाच्या अथक प्रयत्नांनंतर अग्निशमन दलाला आग नियंत्रणात आणण्यात यश आले. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती नाही, परंतु डब्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. रेल्वे प्रशासनाने या घटनेची चौकशी सुरू केली असून, आगीचे कारण शोधण्यासाठी तपास सुरू आहे. स्थानिक नागरिक आणि रेल्वे कर्मचाऱ्यांमध्ये या घटनेमुळे खळबळ उडाली होती.

K P chavan
Author: K P chavan

jin88bet.one ak168app.baby ak168app.club ks168app.site ic88 ic88 ic88 ic88 lr88 lr88 lr88 lr88 op88 si88 88v SEXXXXX-VN

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!