स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहणाची यादी जाहीर ; महायुतीत पुन्हा वाद ?
मुंबई : वृत्तसंस्था राज्यात रायगड आणि नाशिक या दोन जिल्ह्यांच्या पालकमंत्रिपदावरून वाद गेल्या अनेक दिवसापासून पेटलेला आहे. रायगडच्या पालकमंत्री पदावर राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाच्या अदिती तटकरे यांची नियुक्ती करण्यात आली होती. यावर शिवसेना शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनी आक्षेप घेत दावा ठोकला होता. तर नाशिक येथे भाजप नेते गिरीश महाजन यांना पालकमंत्रिपद दिले…