जुगार खेळताना सात जणांना रंगेहाथ पकडले : कासोदा पोलिसांची दमदार कारवाई !
जळगाव : प्रतिनिधी एरंडोल तालुक्यातील कासोदा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बांभोरी शिवारात गालापुर रोडलगत फैजल शेख यांच्या शेतालगत काही इसम जुगार खेळत असल्याची गोपनीय माहिती सपोनि. निलेश राजपूत यांना मिळाल्यानंतर त्यांनी पोलीस पथक घटनास्थळी पाठवले. या पथकाने सायंकाळी साडेचारच्या सुमारास छापा टाकून सात जणांना रंगेहाथ पकडले असून त्यांच्याकडून रोख रक्कम, मोबाईल आणि मोटारसायकली असा एकूण १,६६,०३०…