September 26, 2026 12:48 am

लाईव्ह न्यूज :
लाईव्ह न्यूज :
Home » जळगाव » तरुणीची केली छेडखानी ; तरूणाविरोधात गुन्हा दाखल !

तरुणीची केली छेडखानी ; तरूणाविरोधात गुन्हा दाखल !

वरणगाव : प्रतिनिधी

शिक्षण घेत असलेल्या येथील एका तरुणीसोबत ओळख असल्याचा फायदा घेऊन तिच्याशी अंगलट करून छेडखानी केल्या प्रकरणी तरुणाविरोधात वरणगाव पोलिसांत पोस्कोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर वृत्त असे कि, भुसावळ तालुक्यातील फुलगाव येथील नीलेश लहू कुंभार यांची माध्यमिक शिक्षण घेत असल्यापासून या तरुणीशी ओळख होती. त्याचा गैरफायदा घेऊन या तरुणीस तो ३ सप्टेंबर रोजी मुक्ताईनगर येथे मोटारसायकलवरून घेऊन गेला व कॉलेज सुटल्यानंतर तिला मुक्ताईनगर येथून घराकडे मोटारसायकलने घेऊन येत असताना पाऊस सुरू झाल्याचा फायदा घेत एका झाडाखाडी थांबून या तरुणीशी अंगलट करण्याचा प्रयत्न केला व मोबाईइलवर फोटो काढून ऑनलाइन बदनामी केली. एवढेच नाही तर कोणास काही सांगितले, तर तुझा भाऊ व वडिलांना मारून टाकीन, अशी धमकी देऊन बस स्टँडवर सोडून निघून गेला. या तरुणीने घटनेची माहिती आपल्या नातेवाइकांना दिल्यानंतर पोलिसात १० सप्टेंबर रोजी फिर्याद देण्यात आली.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!