पाळधी रेल्वे स्थानकानजीक रील बनविताना दोन मित्रांचा गेला जीव !
धरणगाव : प्रतिनिधी तालुक्यातील पाळधी या रेल्वे स्थानकाजवळ रीलच्या नादात दोन तरुणांना आपला जीव गमावा लागला आहे. मोबाईलवर व्हिडिओ (रील) बनवण्याचा मोह दोन शाळकरी मित्रांसाठी जीवघेणा ठरल्याची अत्यंत दुर्दैवी घटना रविवारी 25 ऑक्टोबर रोजी सकाळच्या सुमारास धरणगाव तालुक्यातील पाळधी चांदसर रेल्वे गेटजवळ घडली आहे. धावत्या रेल्वेसमोर धोकादायक पद्धतीने रील शूट करत असताना अहमदाबाद-हावडा एक्स्प्रेसने धडक…